Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश काय सांगताय, देशातील 52 लाख मोबाइल कनेक्शन बंद, तर 67 हजार सीम...

काय सांगताय, देशातील 52 लाख मोबाइल कनेक्शन बंद, तर 67 हजार सीम डिलर्स काळ्या यादीत

Subscribe

वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या दुरसंचार मंत्रालयाने सीम कार्ड विक्री आणि एकापेक्षा अनेक सीम कार्ड वापराबाबत नवीन नियमावली जारी केली आहे.

नवी दिल्ली: एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त सीम कार्ड असणे आता बंद होणार आहे. कारण, सीमकार्ड विक्री करण्याबाबत सरकारने नवा निर्णय घेतला आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात सिम कार्ड विकण्यासाठी सिम डीलर्सची पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारच्या या पाऊलामुळे बनावट सिम कार्डची विक्री आणि एकाच नावावर किंवा आयडीवर अनेक सिम कार्डची विक्री थांबणार आहे. (What is it saying 52 lakh mobile connections in the country are closed while 67 thousand SIM dealers are blacklisted)

वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या दुरसंचार मंत्रालयाने सीम कार्ड विक्री आणि एकापेक्षा अनेक सीम कार्ड वापराबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये नवीन सिमकार्डबाबत सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 52 लाख मोबाइल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत, तर 67 हजार सीम डीलर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

66 हजार Whatsapp खातेही बंद

- Advertisement -

याच वर्षातील मे महिन्यांपासून सिम कार्ड विक्रेत्यांवर 300 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट सिम कार्ड रॅकेटमध्ये सहभागी असलेली सुमारे 66 हजार व्हॉट्सअॅप खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत.

हेही वाचा : बिल्किस बानो प्रकरण : 14 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या इतर कैद्यांना दिलासा का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल

तर 10 लाख रुपये दंड

- Advertisement -

नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, पोलिस पडताळणीशिवाय सिमकार्ड विकल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दूरसंचार मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, देशात सुमारे 10 लाख सिम कार्ड डीलर आहेत ज्यांना पोलिस पडताळणी करावी लागेल. याशिवाय दुकानाचे केवायसीही करावे लागणार आहे.

हेही वाचा : “मणिपूर जळत असताना, भाजप इतर राज्यांच्या प्रचारात मग्न”, मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

एकाच्याच नावावर सुरू होते 658 सीम कार्ड

देशात दररोज सिमकार्ड घोटाळ्याचा पर्दाफाश होत आहे. अलीकडेच पोलिसांनी आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्या एका फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच आधारकार्डवर 658 सिमकार्ड देण्यात आले असून, ही सर्व सिमकार्ड वापरण्यात येत होती.

- Advertisment -