पश्चिम बंगाल आणि ओडिशाला इशारा देणारा ‘मोचा’ आहे तरी कोण?

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः पश्चिम बंगाल आणि ओडिशाला चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळाचे नाव ‘मोचा’ आहे. या चक्रीवादळाला मोचा नाव देण्याचे कारणही विशेष आहे.

आशिया खंडातील यमन देशाने या वादळाला मोचा असे नाव दिले आहे. मोचा हे यमनमधील एका शहराचे नाव आहे. या शहराला मोखा असेही म्हणतात. हे शहर कॉफी व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. यावरुनच मोचा कॉफी प्रसिद्ध आहे. संयुक्त राष्ट्राच्या इकोनॉमकि आणि सोशल कमिशन फॉर आशिया आणि स्पेस्फिक (ESCAP) पॅनलचे १३ देश कोणत्याही चक्रीवादळाला नाव देतात. यात भारत, बांग्लादेश, म्यांमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थाईलंड, ईरान, कतार, सऊदी अरब, संयुक्त अरब अमीरात आणि यमन या देशांचा समावेश आहे. अल्फाबेटिकली चक्रीवादळाचे नाव सुचवले जाते. जसे बांग्लादेश असेल तर B ने चक्रीवादळाच्या नावाची सुरुवात होते. अशा प्रकारे चक्रीवादळाला नाव दिले जाते.

मोचा चक्रीवादळ हे वर्षातील पहिले चक्रीवादळ असल्यामुळे जागतिक हवामान संघटनेने (WMO) या संभाव्य वादळाला ‘सायक्लोन मोचा’ असे नाव दिले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS) मॉडेलने म्हटले की, मोचा १२ मे पर्यंत उत्तर, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत प्रवास करेल. मे २०२० मध्ये सुपर चक्रीवादळ ‘अम्फान’ने कोलकात्यासह जवळजवळ संपूर्ण दक्षिण बंगालला उद्ध्वस्त केले होते.

हवामान विभागाकडून मच्छिमारांना आग्नेय बंगालच्या उपसागरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा  देण्यात आला आहे. याशिवाय या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय मध्य बंगालच्या उपसागरातील लोकांना ९ मे पूर्वी सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आजपासून पुढील चार दिवस अंदमान आणि निकोबार बेटांजवळ पर्यटन, ऑफशोअर क्रियाकलाप आणि शिपिंगचे नियमन करण्यात यावे, असेही हवामान विभागाकडून सुचवण्यात आले आहे.