छत्तीगढमधील दंतेश्वरी मंदिराची काय आहे खासियत?

या ठिकाणी देवी दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या सोहळ्यात सहभागी व्हायला मंदिरातून बाहेर येते. बस्तर दसऱ्यामध्ये रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नसून या ठिकाणी देवीच्या रथाची नगर परिक्रमा केली जाते.

देशात देवीची 51 शक्तिपीठं आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे छत्तीसगढच्या दंतेवाडा मधील दंतेश्वरी मंदिर आहे. या ठिकाणी देवी सतीचे दात पडले होते. त्यामुळे येथील देवीला दंतेश्वरी या नावाने ओळखले जाते. दंतेवाडा हे नाव देखील देवीच्या या नावामुळेच पडले आहे. हे शक्तिपीठ इतर शक्तिपीठांपैकी असं एक शक्तिपीठं आहे जिथे दोन नाही, तर तीन नवरात्री साजरी केल्या जातात. इतर ठिकाणी फक्त चैत्र आणि शारदीय नवरात्री साजऱ्या केल्या जातात. मात्र या ठिकाणी फाल्गुन महिन्यातील नवरात्र देखील साजरी केली जाते.

तसेच या मंदिराची अशी खासियत आहे की, या ठिकाणी देवी दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या सोहळ्यात सहभागी व्हायला मंदिरातून बाहेर येते. बस्तर दसऱ्यामध्ये रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नसून या ठिकाणी देवीच्या रथाची नगर परिक्रमा केली जाते. अष्टमीपासूनच देवी दर्शन देण्यासाठी बाहेर पडते. बस्तरमध्ये साजरा केला जाणार हा उत्सव 75 दिवसांपर्यंत सुरू असतो. ही परंपरा जवळपास 610 जुनी असल्याचं म्हटलं जातं.

पौराणिक कथेनुसार, जेव्हा विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने
साती देवीच्या देहाला 52 भागांमध्ये विभक्त केलं. तेव्हा त्यातील 51 भाग देशभरातील विविध ठिकाणी पडले. 52 वां भाग म्हणजे दात या ठिकाणी पडला होता. त्यामुळे या देवीला दंतेश्वरी या नावाने ओळखले जाते.

वर्षातून तीन वेळा होते देवीची विशेष पूजा
देवीच्या दंतेश्वरी मंदिरामध्ये वर्षातून तीन वेळा विशेष पूजा केली जाते. पहिली शारदीय नवरात्र, दूसरी चैत्र नवरात्र आणि तिसरी फाल्गुन नवरात्र असते. या नवरात्रीला फाल्गुन मडई देखील म्हटलं जातं. या काळात 9 दिवसांपर्यंत देवीची पूजा-आराधना केली जाते. तसेच 7 हजारांपेक्षा जास्त तूपाचे आणि तेलाचे दिवे देखील लावले जातात.


हेही वाचा :

महाअष्टमीला अशा प्रकारे करा देवी महागौरीची पूजा