उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. तेव्हापासून कोणत्याही खाद्यपदार्थावर अशाप्राकरे बंदी घालणे योग्य आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर काय याचा निर्णय घेणे हे न्यायालय आणि सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय त्यांच्यावर सोडत आहोत. हलाला प्रमाणपत्र असलेली उत्पादने कोणती आहेत, त्यांना प्रमाणपत्र कोण देत आणि आहे आणि का देत आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने अशा प्रकारच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
हलाल आणि झटका मांस यात काय आहे फरक?
हलाल हा अरबी शब्द आहे. त्याचा हिंदीमध्ये अर्थ मान्य आहे. कुराण शरीफमध्येही दोन अरबी शब्दांचा उल्लेख आहे. हलाल आणि हराम. हलाल म्हणजे इस्लामच्या धर्मानुसार परवानगी किंवा स्वीकार्य असा आहे तर हराम चा अर्थ जे अस्वीकार्य आहे. ज्याला परवानगी नाही. धार्मिक दुष्टिकोनातून अनके गोष्टी या हलाल आणि हराम असू शकतात. परंतु सामान्य भाषेत किंवा व्यवहारामध्ये हलाल हा शब्द अन्नाशी जोडला गेला आहे. म्हणजेच इस्लामनुसार हलालची व्याख्या काय आहेत? खावे आणि काय खाऊ नये हे मर्यादित केले आहे. आणि इस्लामनुसार, सर्व परिस्थितीत हराम असलेल्या दोन गोष्टी म्हणजे डुकराचे मांस आणि दारू.
हेही वाचा… Halal Row : ‘हलाल’ मुद्द्यावरून ‘हिमालया’ ट्रोल; अन् पतंजलीही अडकली वादात?
कोणतेही मासं हलाल असले तरी ते कोणत्या प्राण्यापासून आले आहे, ते कसे मारले गेले आणि त्यानंतर त्याच्या मांसावर प्रक्रिया कशी झाली हे स्पष्टपणे सांगावे लागेल. भारतीय दृष्टीकोनातून पाहिले तर हलाल हा शब्द प्राणी मारण्याची पध्दत म्हणून पाहिला जातो. हलाल पध्दतीने जनावरांची कत्तल करणे म्हणजेच जनावराच्या मानेच्या रक्तवाहिनीवर एक कट केला जातो ज्यामुळे त्याचे सर्व रक्त बाहेर येते. हलाल मांसासाठी एक अनिवार्य अट आहे की प्राणी जिवंत आहे. प्राण्यांच्या कत्तलीदरम्यान शहादा वचाला जातो. शहादा हा अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ अल्लाहवर विश्वास आहे.
मात्र ही संपुर्ण प्रक्रिया हिंदू आणि शीख पशूंची कत्तल करण्याच्या पध्दतीच्या पूर्णपणे उलटी आहे. हिंदू आणि शीख प्राण्याच्या कत्तलीमध्ये झटका या शब्दाचा वापर केला जातो. ज्यामध्ये प्रण्यांना चाकूने एकाच वाराने मरतो आणि जास्त त्रास होत नाही. आणि हलाल आणि झटका यामधील ही लढाई आहे. इस्लाम म्हणते की प्राण्याच मांस खाल्लं पाहिजे पण त्यामध्ये रक्त असू नये. म्हणून प्राण्याच्या मानेवर कट मारला जातो. जेणे करून त्याप्राण्यामधील रक्त हळूहळू पाहेर पडेल. या काळात प्राण्यांना खुप त्रास सहन करावा लागतो. तर एका झटक्यात प्राण्यांची मान कापली जाते. यामध्ये प्राण्यांचे शीर एकाच घावत धडापासून वेगळे केले जाते. यात त्याप्रण्याला तडफडत ठेवले जात नाही, आणि त्या प्राण्याला जास्त त्रास देखील होत नाही. मांस विकणारे इस्लामचे अनुयायी त्यांचे मांस हलाल असल्याचे सांगतात, तर या कामात सहभागी असलेले हिंदू किंवा शीख समाजाचे लोक त्यांचे मांस झटका असल्याचे सांगतात.
यूपीमध्ये हलालवर बंदी का आली?
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने अशा प्रमाणपत्रांसह उत्पादनांवर बंदी घातली आहे. लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरचा संदर्भ यामागे आहे, लखनऊमध्ये राहणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे अधिकारी शैलेंद्र कुमार शर्मा यांनी दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, काही कंपन्या हलाल प्रमाणपत्राचा वापर करून विशिष्ट समुदायामध्ये त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवत आहेत, ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. 17 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या या एफआयआरनंतर, 18 नोव्हेंबर रोजी योगी सरकारने संपूर्ण यूपीमध्ये अशा प्रमाणपत्रांसह उत्पादनांवर बंदी घातली आहे. पोलिसांनी चेन्नईच्या हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दिल्लीच्या जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट आणि हलाल कौन्सिल ऑफ इंडिया आणि मुंबईच्या जमीयत उलेमा यांच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
हलाल प्रमाणपत्र कोण देते?
हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी देशात कोणतीही अधिकृत सरकारी संस्था नाही. अशा काही संस्था आहेत ज्यांना मुस्लिम धर्माचे अनुयायी आणि जगातील सर्व इस्लामिक देश मान्यता देतात आणि त्या संस्थेने दिलेले हलाल प्रमाणपत्र योग्य असेल असा विश्वास आहे. उदाहरणार्थ, एक संस्था म्हणजे हलाल इंडिया. आपल्या वेबसाइटवर दावा केला आहे की हलाल प्रमाणपत्र देण्यापूर्वी ही संस्था अनेक प्रकारच्या लॅब चाचण्या आणि ऑडिटमधून जाते. आणि हेच कारण आहे की कतारच्या आरोग्य मंत्रालयापासून ते UAE आणि मलेशियापर्यंत प्रत्येकजण हे प्रमाणपत्र ओळखतो. आणि भारतातून जी काही उत्पादने जगातील सर्व इस्लामिक देशांमध्ये पाठवली जातात, त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे.