घरदेश-विदेशअटल बिहारी वाजपेयींची लाईफ सपोर्ट सिस्टिम होती तरी कशी?

अटल बिहारी वाजपेयींची लाईफ सपोर्ट सिस्टिम होती तरी कशी?

Subscribe

सध्या वाजपेयींना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे. काय असते ही सपोर्ट सिस्टिम? जाणून घेऊया

भारताचे पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती ढासळली होती. गेल्या ९ आठवड्यांपासून अटल बिहारी वाजपेयींना दिल्लीतील ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र १५ ऑगस्टच्या संध्याकाळपासून त्यांची प्रकृती अतिशय बिघडली असल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. गेल्या २४ तासामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणताही सुधारणा नसल्याचं समोर आलं. वाजपेयींना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं होतं. काय असते ही सपोर्ट सिस्टिम?

काय आहे लाईफ सपोर्ट सिस्टिम?

शरीराच्या अवयवांना नियंत्रणात आणण्यासाठी लाईफ सपोर्ट सिस्टिमचा उपयोग करण्यात येतो. शरीराच्या अवयवांना जेव्हा गरज असते, तेव्हा या सिस्टिमचा उपयोग करण्यात येतो. या सिस्टिमच्या मदतीनं रिकव्हर होण्यासाठी मदत होते. तसंच व्यक्ती जिवंत राहण्यास, या सिस्टिमची मदत होते. वास्तविक प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही सिस्टिम उपयोगात येईलच असं नाही. काही बाबतीत शरारीचे अवयव साथ देत नाहीत आणि रिकव्हर होऊ शकत नाहीत.

- Advertisement -

या सिस्टिमची आवश्यकता कधी भासते?

श्वासोच्छवास, ह्रदय, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टिम फेल होत गेल्यावर व्यक्तीला लाईफ सपोर्ट सिस्टिमची गरज भासते. बऱ्याचदा मेंदू आणि नर्व्हस सिस्टिमदेखील काम करणं बंद करतं. परंतु, लाईफ सपोर्ट सिस्टिमद्वारे जर इतर शरीर काम करत असेल, तर नर्व्हस सिस्टिम स्वतःहून काम करायला लागतात. तसंच ह्रदय बंद पडलं असल्यास, पुन्हा सुरु करण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जातात. सीपीआरद्वारे असं करण्यात येतं. सीपीआरमधून शरीरात रक्त आणि ऑक्सीजन भरपूर प्रमाणात पोहचवली जातं, ज्यामुळं रूग्णाचं रक्ताचं सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे चालू होतं. तर ह्रदयाचे ठोके बंद पडल्यानंतर इलेक्ट्रिक शॉक देण्यात येतो, ज्यामुळं ह्रदयाचे ठोके व्यवस्थित होण्याची शक्यता असते.

कसा दिला जातो लाईफ सपोर्ट?

सर्वात पहिले रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून ऑक्सीजन दिला जातो. यातून हवा दबाव बनवून फुफ्फुसापर्यंत पोहचते. विशेषतः निमोनिया आणि फुफ्फुसांचं काम करणं बंद झाल्यास, व्हेंटिलेटर सुरु करण्यात येतं. लाईफ सपोर्टमध्ये एक ट्यूब रुग्णाच्या नाकामधून शरीरामध्ये घालण्यात येते. तर ट्यूबचा दुसरा भाग हा इलेक्ट्रीक पंपाला जोडण्यात आलेला असतो.

- Advertisement -

लाईफ सपोर्ट सिस्टिम कधी हटवण्यात येते?

दोन स्थितीमध्ये रुग्णाची लाईफ सपोर्ट सिस्टिम हटवण्यात येते. डॉक्टरांच्या आशेप्रमाणे रुग्णाच्या शरीरात सुधारणा होऊन अवयव काम करायला लागल्यास, लाईफ सपोर्ट सिस्टिम हटवण्यात येते. तर दुसरी स्थिती अजिबात शरीराच्या स्थितीमध्ये सुधारणा न झाल्यासदेखील लाईफ सपोर्ट सिस्टिम हटवण्यात येते मात्र त्यासाठी कुटुंबाच्या संमतीची गरज भासते. मात्र असं केल्यानंतरही डॉक्टर्स उपचार चालूच ठेवतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -