घर देश-विदेश Chandrayan 3 यशस्वी करणाऱ्या ISRO च्या शास्त्रज्ञांना पगार किती? माजी प्रमुखांनी दिली...

Chandrayan 3 यशस्वी करणाऱ्या ISRO च्या शास्त्रज्ञांना पगार किती? माजी प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती

Subscribe

Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग होताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला. याशिवाय देशभरातूनही भारतावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अशातच भारताचे ‘चांद्रयान-3’ यशस्वी करणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना पगार किती, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर इस्त्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी दिले आहे. जे ऐकून सर्वांनाच नक्कीच धक्का बसेल. (What is the salary of ISRO scientists who made Chandrayan 3 successful Shocking information given by the former chief)

हेही वाचा – Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी केले ट्रोल

- Advertisement -

जी माधवन म्हणाले की, भारतीय अंतराळ संस्थेचा इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात अंतराळ संशोधन करण्याचा इतिहास आहे. मात्र असे असले तरी इस्रोमधील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचार्‍यांना मिळणारे पगार भत्ते हे जगभरातील शास्त्रज्ञांना मिळणाऱ्या पगार भत्त्यांपैकी एक पंचमांश म्हणजे पगाराच्या पाचव्या भागाइतके आहे. इस्रोचे कोणीही शास्त्रज्ञ करोडपती नाहीत. ते अतिशय साधे जीवन जगतात. खरं म्हणजे त्यांना पैशाचीही पर्वा नाही. कारण त्यांना पैशापेक्षा त्यांच्या ध्येयाप्रती आवड आणि बांधिलकी आहे. त्यामुळेच आपण संशोधन क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करतो, असे जी. माधवन नायर यांनी सांगितले.

हेही वाचा – ISRO : ‘चांद्रयान-3’ ने इतिहास रचताना लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोडला रेकॉर्ड; एवढ्या लोकांनी पाहिले यशस्वी लँडिंग

- Advertisement -

युरोप आणि अमेरिकेसोबतच्या व्यावसायिक करारात वाढ होईल

‘चांद्रयान-3’ च्या यशाबद्दल बोलताना जी. माधवन म्हणाले की, उत्कृष्ट नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून आम्ही हे यश मिळवू शकलो. कारण आम्ही भूतकाळात जे शिकलो आहोत ते पुढील मिशनमध्ये लागू करतो. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनासाठी आम्ही 30 वर्षांपूर्वी बनवलेले इंजिन जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलमध्ये देखील वापरले आहे. याशिवाय भारत आपल्या अंतराळ मोहिमांसाठी देशांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यामुळे आमच्या मिशनचा खर्च कमी होण्यास मदत होते. त्यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांचा खर्च इतर देशांच्या अंतराळ मोहिमांच्या तुलनेत 50 ते 60 टक्क्यांने कमी आहे. ‘चांद्रयान-3’ च्या यशाने आम्ही चांगली सुरूवात करताना मोठी कामगिरी केली आहे. भारताचे युरोप आणि अमेरिकेसोबत अनेक व्यावसायिक करार आहेत. त्यामुळे आता त्यात वाढ होईल, असा विश्वासही जी. माधवन नायर व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Chandrayaan-3 नंतर आता इस्रोची ‘आदित्य एल-1’ मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास

‘चांद्रयान-3’ चे यश इस्रोचे नेतृत्व आणि शास्त्रज्ञांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीचे फळ

‘चांद्रयान-3’ मोहीम यशस्वी करणारे इस्रोचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते खूप साधे आणि सरळ आहेत. एखादा अधिकारी किंवा व्यक्ती छोट्याशा कामगिरीवरही अहंगंड दाखवू लागतो, मात्र साध्या स्वभावाने संपन्न असलेले सोमनाथ ‘चांद्रयान-3’च्या यशाचे श्रेय इस्रोच्या नेतृत्वाला आणि शास्त्रज्ञांच्या पिढ्यानपिढ्या मेहनतीला देत आहेत. त्यांनी ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केल्यानंतर एस. सोमनाथ म्हणाले की, हे यश ‘प्रचंड’ आणि ‘उत्साहजनक’ आहे. त्यांनी इस्रोचे माजी प्रमुख एएस किरण कुमार आणि इतर शास्त्रज्ञांचे आभार मानताना ‘चांद्रयान-3’च्या मिशन यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ‘चांद्रयान-3’ चे यश साजरे करताना चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 बनवणाऱ्या संपूर्ण टीमच्या योगदानाचे स्मरण आणि आभार मानले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

- Advertisment -