घरCORONA UPDATEVaccine Tourism : भारतीय नागरिक परदेशातही घेऊ शकतात कोरोना लस?

Vaccine Tourism : भारतीय नागरिक परदेशातही घेऊ शकतात कोरोना लस?

Subscribe

देशासह जगभरात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. मात्र परदेशात जाण्यापूर्वी भारतीयांना WHO ने मान्यता दिलेल्या लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. यात काही दिवसांपूर्वी दुबईस्थित अरबी नाईट टूर्सने दिल्ली ते मॉस्को अशी २४ दिवसांचे टूर पॅकेज जाहीर केले होते. विशेष म्हणजे पॅकेजमध्ये पर्यटकांसाठी रशियाची स्पुतनिक-व्ही लसीचे दोन डोसचाही समावेश केला होता. तब्बल १.३ लाख रुपयांच्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना स्पुटनिक-व्ही लसीचे दोन डोस देण्याबरोबरचं रशियात २० दिवस पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी देण्याची घोषणा केली होती. परंतु अरबी नाईट टूर्स वेबसाइटवरून हे पॅकेज आता डिलीट करण्यात आले आहे.

भारतातही ‘व्‍हॅक्‍सीन टुरिझम’ पॅकेजवर विचार सुरु 

हे पॅकेज जरी चांगले वाटत असले तरी यातील अडचणी दूर करणे महत्त्वाचे आहे. पहिली अडचण म्हणजे भारत ते रशिया प्रवास करण्यासाठी लागणारा व्हिसा आणि त्यानंतरचा विमान प्रवास. भारतातही अशा अनेक टुरिझम एजंसी आहेत ज्या अशाप्रकारे ‘व्‍हॅक्‍सीन टुरिझम’ पॅकेजवर विचार करीत आहेत. कोरोना विषाणुच्या दुसऱ्य़ा लाटेमुळे अनेक देशांनी भारतातून जाणारी विमान उड्डाण बंद केली आहेत. परंतु ही बंदी जेव्हा उठवली जाईल, तेव्हा आम्ही व्‍हॅक्‍सीन टुरिझम पॅकेजवर विचार करु शकतो. असे भारतीय टूरिस्ट कंपन्यांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

‘व्‍हॅक्‍सीन टुरिझम’ प्रवासाचा एक नवीन प्रकार

गेल्या आठवड्यात युरोपियन नागरिकांचे छोटेसे शहर म्हणजे सेन मारिनो येथे लसीकरणासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांचे स्वागत करण्यात आले. लटविया येथून ४ पर्यटक लस घेण्यासाठी २६ तासांचा प्रवास करत सेन मारिनो येथे पोहचले. त्यामुळे हे पर्यटक हॉलिडे पॅकेजद्वारे परदेशात लस घेणारे पहिले पर्यटक बनले आहेत. रशिया आणि मालदीव इतर देशांतील नागरिकांना व्‍हॅक्‍सीन टुरिझमच्या माध्यमातून लस देण्याची योजना आखत आहेत. या अमेरिकाचाही समावेश आहे. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेचे नागरिक लसीकरणासाठी झिम्बाब्वेपर्यंत प्रवास करत आहेत. यात कॅनडा आणि दक्षिण अमेरिकेतील लोक यूएसला जात आहेत.

कोरोनाविरोधी लस घेण्यासाठी भारतीय इतर देशांमध्ये जाऊ शकतात?

यावर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने असा विश्वास व्यक्त केला आहे की, लसीकरणासाठी भारतीयांना भारतातून कोणत्याही दुसर्‍या देशात जावे लागणार नाही. या वर्षाखेरीस, देशातील सर्व लोकांना कमीतकमी किंमतीत लसी दिली जाईल. मात्र असे असूनही भारतात व्‍हॅक्‍सीन टुरिझम संकल्पना लोकप्रिय होत आहे. परंतु यात ज्या देशांमध्ये लसींची कमतरता आहे किंवा ज्या लोकांना गंभीर आजार आहेत त्यांना लसी दिली जात नाही. सध्या देशात हवाई प्रवासास परवानगी असेल तर लसीकरणासाठी दुसर्‍या देशात प्रवास करणे बेकायदेशीर नाही. जानेवारीत फ्लोरिडा देशाने व्‍हॅक्‍सीन घेण्यास येणाऱ्या नागरिकांना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा सादर बंधनकारक केले होते.

- Advertisement -

ट्रॅव्हल एजन्सीसाठी चांगली संधी

ट्रॅव्हल एजन्सींनी कोरोना काळातील सर्वात जास्त त्रास सहन केला आहे, परंतु ट्रॅव्हल एजंट्स या ऑफरद्वारे त्यांच्या व्यवसायाला नवीन वळण देण्याचा विचार करीत आहेत.आणि ज्या प्रवाश्यांना भारतीयांसाठी दोन इन वन सुट्ट्या आणि लस देऊन प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी रशिया हे सर्वात पसंत ठिकाण आहे.


Corona Update: देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ, तर ३८४७ जणांचा मृत्यू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -