घरदेश-विदेशArvind Kejriwal : मोदी जे करतायत ते चांगलं नाही...न्यायालयात जाण्यापूर्वी केजरीवाल काय...

Arvind Kejriwal : मोदी जे करतायत ते चांगलं नाही…न्यायालयात जाण्यापूर्वी केजरीवाल काय म्हणाले

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कथित मद्य उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

केजरीवाल यांच्या कोठडीची मुदत 1 एप्रिल रोजी संपली. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी मीडियाने त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात येण्यापूर्वी मीडियाशी बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावेळी केजरीवाल एकच वाक्य बोलले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत, ते देशासाठी चांगलं नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray Group : भाजपामध्ये नमो नव्हे तर मनोरुग्ण; उद्धव गटाचा हल्लाबोल

केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत – ईडी

केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. एएसजी एस.व्ही. राजू यांनी ईडीची बाजू मांडली. केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत आणि सतत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचं सांगत ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. केजरीवाल यांना तूर्त न्यायालयीन कोठडी सुनावण्यास हरकत नाही, मात्र नंतर ईडीला त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता लागू शकते, असं राजू यांनी खंडपीठापुढं सांगतिलं.

- Advertisement -

पुढचे 15 दिवस तिहार तुरुंगात

केजरीवाल यांना कोर्टात आणलं गेलं तेव्हा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि ‘आप’च्या नेत्या आतिशीही कोर्टात हजर होत्या. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही केजरीवाल आता पुढील 15 दिवस तिहार तुरुंगात राहणार आहेत.

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना अटक केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार केजरीवाल असल्याचा ईडीचा दावा आहे. अटकेनंतर सुरुवातीला केजरीवाल यांना 7 दिवस ईडी रिमांड सुनावली होती. त्यानंतर 28 मार्च रोजी केजरीवाल यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि ईडीची कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयानं केजरीवाल यांना 15 दिवसांची कोठडी सुनावली.

हेही वाचा – Ramesh Baraskar : वंचितच्या दुसऱ्या यादीनंतर शरद पवार गटातून बारसकरांची हकालपट्टी; कारण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -