Internet Global Outage: तब्बल ७ तासांनी What’s App,Facebook,Instagram सेवा पूर्ववत

सेवा पूर्वपदावर येताच मीम्स व्हायरल

What's App, Facebook,instagram coming back online after 7 hours
तब्बल ७ तासांनी What's App, Facebook,instagram सेवा पूर्ववत

व्हॉट्स अ‍ॅप ( What’s App) इन्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोमवारी रात्री अचानक डाऊन झाले. रात्री ९ वाजल्यापासून युझर्सना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक,इन्स्टाग्राम वापरण्यास अडचणी येऊ लागल्या. आता तब्बल ७ तासांनंतर या सेवा पूर्वपदावर आल्या आहेत. (What’s App, Facebook,Instagram coming back online after 7 hours)  मंगळवारी पहाटेपासून या सेवा सुरळीत काम करत आहेत. सोशल मीडियावर तीन महत्त्वाचे प्लॅटफॉर्म एकाच वेळी डाऊन झाल्याने युझर्सना त्याचा मोठा फटका बसला. सेवा ठप्प झाल्याने फेसबुकने युझर्सची माफी मागत ‘आम्ही आमचे अ‍ॅप, आणि सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आता हे सांगताना आनंद होत आहे की या सेवा पुन्हा सुरळीत झाल्या आहेत’, असे फेसबुकने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ट्विट करत सेवा ठप्प झाल्याने युझर्सना आलेल्या अडचणींविषयी दिलगीरी व्यक्त केली आहे. ‘तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात याची आज आम्हाला पुन्हा जाणीव झाली. व्हॉट्स अ‍ॅप,,फेसबुक,इन्स्टाग्राम,मेसेंजर हे अ‍ॅप्स पुन्हा ऑनलाईन आले असून युझर्सना झालेल्या त्रासासाठी मी त्यांची माफी मागतो’,असे मॉर्क झुकरबर्ग यांनी म्हटले.

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. १०० सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागले. कंपनी नेटवर्किंग समस्यांचा सध्या सामना करत असून त्यांची टीम लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी काम करत असल्याचे फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Mike Schroepfer यांनी  म्हटले आहे.

सेवा पूर्वपदावर येताच मीम्सचा पाऊस

व्हॉट्स अ‍ॅप,, फेसबुक, इन्स्टाग्राम वापरणाऱ्या युझर्सना या सेवा डाऊन झाल्याने रात्री चांगलाच हिरमोड झाला. मात्र सेवा पूर्वपदावर येताच मीम्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना या सेवा डाऊन होत्या हे त्या सेवा पुन्हा पूर्वपदावर आल्या नंतर कळले असे त्यांनी म्हटले आहे. तर काहींनी व्हॉट्स अ‍ॅप,फेसबुक,इन्स्टाग्राम डाऊन झाल्यावर ट्विटर मात्र सुरू होते असे म्हटले आहे.

पहा काही व्हायरल झालेले मीम्स

 

 

 


हेही वाचा – ब्रेकिंग न्यूज: Whatsapp, Facebook आणि Instagram झालं डाऊन