घरताज्या घडामोडीकेजरीवाल आणि 'व्हॅलेंटाईन डे'च खास नातं

केजरीवाल आणि ‘व्हॅलेंटाईन डे’च खास नातं

Subscribe

अरविंद केजरीवाल यांचे 'व्हॅलेंटाईन डे'चे खास कनेक्शन असल्याचे मानले जात आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये जर पुन्हा एकदा आपचे सरकार आले तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार आहेत. तसेच १४ फ्रेबुवारी म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ला केजरीवाल शपथ घेण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे ‘व्हॅलेंटाईन डे’शी खास असे नाते आहे. कारण ‘व्हॅलेंटाईन डे’ने दोनदा इतिहास घडवला आहे.

काय आहे नेमका इतिहास?

दिल्ली विधानसभेत २०१३ मध्ये पहिल्यांदाच ‘आप’ला सत्ता मिळाली होती. यावेळी ‘आप’ला २८, भाजपला ३१ आणि काँग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या मदतीने अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, हे सरकार फक्त ४९ दिवसच टिकले. केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशीच राजीनामा दिला होता. ‘आप’चं हे सरकार चांगलेच वादग्रस्त ठरले होते.

- Advertisement -

२०१५ चा ‘व्हॅलेंटाईन डे’

२०१५ ला निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘आप’चे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी घोषणा केली होती की, आपल्याला जर लोकांनी संधी दिली तर ते १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानावरच शपथ घेतील. त्याप्रमाणे लोकांनी ‘आप’वर विश्वास टाकत ६७ जागा आपच्या पारड्यात टाकल्या. तर भाजपला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला आपले खाते देखील खोलता आले नाही. त्यावेळी केजरीवालांनी पूर्णबहुमताच्या सरकारचे मुख्यमंत्री होत १४ फेब्रुवारीलाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.


हेही वाचा – शाहीनबाग आंदोलनाचा भाजपला तोटा? ओखला मतदारसंघात आप-भाजपमध्ये काँटे की टक्कर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -