घरदेश-विदेश'फिंगरप्रिंट लॉक'मुळे व्हॉट्सअॅप चॅट राहणार सुरक्षित

‘फिंगरप्रिंट लॉक’मुळे व्हॉट्सअॅप चॅट राहणार सुरक्षित

Subscribe

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमुळे युजर्सचे 'व्हॉट्सअॅप चॅट' आता सुरक्षित राहणार

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंती पडणारे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं असतं. काही दिवसांपुर्वीचे व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणल होतं. यामध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर’ (PIP) असं हे फीचर व्हॉट्सअॅप वेबवरही उपलब्ध करण्यात आला. मात्र आता व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा नवीन फीचर आणलं आहे. बरेच व्हॉट्सअॅप युजर्स व्हॉट्सअॅपला लॉक करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करताच. पण आता व्हॉट्सअॅपच्या या नवीन फिचरमुळे थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करता येणार नाही. ‘पिक्चर-इन-पिक्चर’नंतर व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवं फिचर घेऊन येत आहे. या फिचरमुळे तुमचं चॅट आणखी सुरक्षित होणार आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

व्हॉट्सअॅपवरील चॅट राहणार सुरक्षित

व्हॉट्सअॅपच्या ‘फिंगरप्रिंट लॉक’ मुळे आता व्हॉट्सअॅपवरील चॅट सुरक्षित राहणार आहेत. एखादी व्यक्ती काही खासगी गोष्टी व्हॉट्सअॅपवर एखाद्याला पाठवते. तसेच पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीचा फोन दुसऱ्याच्या हातात असल्याने तो मेसेज वाचला देखील जाऊ शकतो. त्यामुळे तो मेसेज सुरक्षित राहिलंच असं सांगता येत नाही. मात्र आता व्हॉट्सअॅपच्या नवीन ‘फिंगरप्रिंट लॉक’ मुळे ही भिती राहणार नाही. ‘फिंगरप्रिंट लॉक’ फिचमुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय त्या व्यक्तीचे व्हॉट्सअॅप कोणालाही उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे. या फिचरसह व्हॉट्सअॅपकडून इतरही काही फिचर्स आणली जाणार आहेत.

- Advertisement -

वाचा – अँड्रॉइड मोबाइलनंतर व्हॉट्सअॅप वेबवरही आता ‘पिक्चर-इन-पिक्चर’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -