घरताज्या घडामोडीव्हाॅट्सअॅपने वाढदिवसानिमित्त युझर्सना दिलं मोठं गिफ्ट, जाणून घ्या

व्हाॅट्सअॅपने वाढदिवसानिमित्त युझर्सना दिलं मोठं गिफ्ट, जाणून घ्या

Subscribe

व्हाॅट्सअॅपकडून विविध प्रकारचे नवे फिचर्स हे युझर्सना दिले जातात. जेणेकरून एखाद्या व्यक्तिशी संवाद साधणे अगदी सोपे आणि जलद होईल किंवा एखादी माहिती, डेटा ट्रान्सफर करण्यास युझर्सना सोयीचे होईल. दरम्यान, ७ फेब्रुवारी २०१० ला व्हाॅट्सअॅप अधिकृतरित्या दाखल झाले. काल व्हाॅट्सअॅपचा वाढदिवस साजरा झाला. परंतु या वाढदिवसानिमित व्हाॅट्सअॅपने युझर्सना नवं फिचर दिलं आहे.

१३ व्या वर्षपूर्तीनिमित्त कंपनीने स्टेट्ससंदर्भात एक नवे फिचर्स दाखल केले आहे. या फिचर्सद्वारे यूझर्स व्हाॅटसअॅपवरुन एकाचवेळी १०० फोटो, व्हिडिओ शेअर करु शकतात. आतापर्यंत एकाच वेळी फक्त ३० मिडिया फाईल्स शेअर्स केले जात होते. मात्र, आता अधिकाधिक फाईल्स शेअर करणे सोपे होणार आहे. व्हाॅट्सअॅपच्या या नव्या फिचर्संसंदर्भातील माहिती डब्ल्यूएबिटाइन्फोने ट्विटद्वारे शेअर केली आहे.

- Advertisement -

या फिचरला कंपनी बीटा व्हर्जनमध्ये रोल आऊट करणार आहे. जर तुम्ही व्हाॅट्सअॅप अँन्ड्राँईडचे २.२३.४.३ बीटा व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला या फिचर्सचा आनंद घेता येईल.

- Advertisement -

हेही वाचा : layoffs : मागील ३ दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांची कपात; ‘या’ कंपन्याही तयारीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -