घरदेश-विदेशआता व्हिडिओ ग्रुप कॉलिंग एका क्लिकवर

आता व्हिडिओ ग्रुप कॉलिंग एका क्लिकवर

Subscribe

व्हॉट्सअॅपने युजर्सकरता आणले दोन नवीन फीर्चस

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं. आता या व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्सकरता दोन नवीन फीसर्चस आणले आहे. व्हॉट्सअॅपने ‘आयओएस’ (IOS) युजर्ससाठी व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलिंग आधीपेक्षा अधिक सोप्पं आणि सुटसुटीत होणार आहे. गेल्या महिन्यात फीचर्सची चाचणी केल्यानंतर आता व्हॉट्सअॅपमध्ये या नव्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.


वाचा – गुगलनंतर व्हॉट्सअॅपही फेक न्यूज विरोधात

- Advertisement -

हे व्हर्जन अपडेट कराव लागणार

जे ग्राहक आयफोन वापरतात त्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपचे नवीन व्हर्जन २.१८.११० अपडेट करावं लागणार आहे. या व्हॉट्सअॅपमध्ये ग्रुप कॉलिंग एका क्लिकवर होणार आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या बाजुला एक नवीन ग्रुप कॉलिंग बटन दिसणार आहे. त्यामुळे आता कॉल करणे अधिक सोपे जाणार आहे. तर दुसर फीचर्समध्ये कॉल स्क्रीनवर एक नवीन ग्रुप कॉल शॉर्टकट सुद्धा दिसणार आहे. हे व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर ग्रुप व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल करणे आधीपेक्षा अधिक सोयीस्कर जाणार आहे. या ग्रुप कॉलिंगमध्ये तुन्ही केवळ तीन माणसं जोडू शकतात. कारण या ग्रुप कॉलिंगमध्ये जास्तीत जास्त चार व्यक्ती जोडण्याची मुभा देण्यात आली आहे.

स्टिकर सेक्शन

व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्ससोबत आयफोन युजर्सकरत्यांना आणखी काही अपडेट मिळणार आहेत. व्हॉट्सअॅपे लेटेस्ट व्हर्जन केल्यानंतर युजर्सना एक नवीन स्टिकर आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर नवीन स्टिकर पॅक्स डाउनलोड करता येतील. याशिवाय नवीन यूजर्ससाठी जीआयएफ (GIF) आयकॉन स्टिकर सेक्शन दिसणार आहेत.

- Advertisement -

वाचा – व्हॉट्सअॅप अपडेट! एका स्वाईपवर करा रिप्लाय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -