तुमच्या WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? PIB ने चेक केले फॅक्ट

कोरोनामुळे व्हायरल होणाऱ्या मेसेजवर सरकारची करडी नजर असणार आहे. हे रिअल फॅक्ट चेक करण्यात आले आहे.

WhatsApp Red tick doesn't mean government is snooping on you
तुमच्या WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? PIB ने चेक केले फॅक्ट

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. मात्र, अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज चिंतेचीबाब ठरत आहे. सोशल मीडियावर अनेक चुकीचे मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहेत. त्यामुळे चुकीचे गैरसमज पसरत आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुमच्या WhatsApp मेसेजवर सरकार करडी नजर ठेवणार आहे, असे मेसेज काही दिवसांपासून फिरत होते. मात्र, या मेसेजमध्ये किती तथ्य आहे. हे PIB ने चेक करत खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर अनेक चुकीचे मेसेज, माहिती फॉरवर्ड करण्यात येत आहे. दरम्यान, आता सरकार तुमच्या मेसेजवर करडी नजर ठेवणार, असे मेसेज व्हायरल होत होते. मात्र, याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजचे, पीआयबी (PIB) रिअल फॅक्टने चेक केले असून ही बाब खोटी असल्याचे सांगितले आहे. तुम्ही एखाद्याला मेसेज केला की तो मेसेज समोरच्या व्यक्तीला गेल्यानंतर एक सिंगल खूण दिसते. त्यानंतर समोरच्याला तो मेसेज गेल्यानंतर दोन खुणा दिसतात. तसेच जर तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवला आणि त्याने मेसेज वाचला तर दोन निळ्या खुणा दिसतात.

असे चेक केले रिअल फॅक्ट

यापुढे तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर एक निळी खूण आणि २ लाल खुणा दिसणार, म्हणजे सरकार तुमच्या डेटाची तपासणी करत आहे. २ निळ्या आणि १ लाल खूण दिसली म्हणजे सरकार तुमच्या विरोधात कारवाई करु शकते आणि जर ३ लाल खुणा दिसल्या तर समजा सरकारने कारवाई सुरु केली आहे. तसेच त्या युजर्सला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे, असा मेसेज व्हायरल होत होता. मात्र, हे फेक असल्याचे समोर आले आहे.

भारत सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोने ही माहिती पूर्णपणे चुकीची असून सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज चुकीचा असल्याचे सांगितले आहे. PIB ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एक ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. तसेच ट्विटमध्ये सांगितले आहे की, ‘ही माहिती पूर्णपणे चुकीची असून सरकारद्वारे, असे काहीही केले जात नाही.’


हेही वाचा – Coronavirus: न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचं कोरोनामुळे निधन