गव्हानंतर आता पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातीवरही बंदी येणार, केंद्राचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांत गव्हाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच, आता या महागाईचा फटका पिठाच्या निर्यातीवरही होणार आहे. किरकोळ बाजारात पीठ महाग झाल्याने वर्षभरात १३ ते १५ टक्क्यांनी पिठाची किंमत वाढली आहे. 

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. आता केंद्र सरकारकडून पिठाच्या निर्यातीवर बंदी येणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना येणार असून नवीन मार्गदर्शक तत्वे १२ जुलै पासून लागू होणार आहेत. (wheat atta restricts exports of wheat flour and other derivatives)

गव्हाच्या निर्यातीसाठी Inter-Ministrial Committee ची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीने परवानगी दिली तरच पिठाच्या निर्यातीला परवानगी देण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने आपल्या अधिसूचने म्हटलं आहे. तसेच, हे नियम पीठ, मैदा, रवा यांवरही लागू असणार आहे. म्हणजेच, पीठासह रवा आणि मैदासुद्धा निर्यात करण्यास बंदी येणार आहे.

गेल्या काही दिवसांत गव्हाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच, आता या महागाईचा फटका पिठाच्या निर्यातीवरही होणार आहे. किरकोळ बाजारात पीठ महाग झाल्याने वर्षभरात १३ ते १५ टक्क्यांनी पिठाची किंमत वाढली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकल्याने जगभर बाजार कोसळले होते. परिणामी महागाईत वाढ झाली होती. त्यामुळे गव्हाचेही भाव वाढले होते. त्यामुळे गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.