घर देश-विदेश काठमांडू एअरपोर्टवर चाक झाले लॉक, ट्रॅक्टरच्या मदतीने एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हटविले

काठमांडू एअरपोर्टवर चाक झाले लॉक, ट्रॅक्टरच्या मदतीने एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हटविले

Subscribe

काठमांडू : काठमांडूहून दिल्लीला (Kathmandu-Delhi flight) येणारे एअर इंडियाचे (Air India) विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच, तांत्रिक बिघाड झाल्याने ते तसेच थांबविण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले. ही घटना काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Tribhuvan International Airport) घडली. विमानतळाचे प्रवक्ते सुवास झा (Airport spokesman Subas Jha) यांनी या घटनेला दुजोरा दिला.

- Advertisement -

एअर इंडियाचे विमान एआय-216 दिल्लीच्या दिशेने उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालेले असतानाच, मंगळवारी पहाटे 4 वाजता तांत्रिक बिघाड झाला. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाचे चाक लॉक झाल्याची माहिती अभियंत्यांच्या पथकाने तपासाअंती दिल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा – …तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद, भाजपची अट; वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ

- Advertisement -

काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या या विमानात 179 प्रवासी होते. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले, असे सांगून प्रवक्ते झा म्हणाले, धावपट्टीवरच विमानात बिघाड झाल्याने तासभर पुढील उड्डाणांवर त्याचा विपरित परिणाम झाला. दोन आंतरराष्ट्रीय आणि पाच राष्ट्रीय उड्डाणे आकाशातच रोखण्यात आली. ट्रॅक्टरच्या मदतीने विमान धावपट्टीवरून हटवून पार्किंगमध्ये नेल्यानंतर उड्डाणे नियमितपणे सुरू करण्यात आली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी स्वतःही आरशात पाहायला हवे, कळवा रुग्णमृत्यू प्रकरणी ठाकरे गटाने सुनावले

दोन महिन्यांपूर्वीच रशियात इमर्जन्सी लँडिंग
मागील अनेक महिन्यांपासून एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक समस्या उद्भावत आहेत. सातत्याने येणाऱ्या या तात्रिंक समस्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे अलीकडेच रशियात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. 6 जून रोजी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 173 इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे रशियातील मगदान (Magadan, Russia) येथे ते उतरवण्यात आले होते. या विमानात 216 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्स होते.

- Advertisment -