Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश विजय मल्ल्यावर १७ बँकांचे कर्ज... तरी विदेशात ३३० कोटींची संपत्ती खरेदी

विजय मल्ल्यावर १७ बँकांचे कर्ज… तरी विदेशात ३३० कोटींची संपत्ती खरेदी

Subscribe

या प्रकरणी सीबीआयने यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण ११ आरोपींच्या नावांचा समावेश होता, मात्र आता या प्रकरणात आणखी एका नावाची भर पडली आहे.

भारतातील फरार उद्योजक विजय मल्ल्याबाबत सीबीआयने मोठा दावा केला आहे. २०१५-१६ मध्ये जेव्हा किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक संकटात होती तेव्हा विजय मल्ल्याकडे पुरेसा पैसा होता आणि त्याच वेळी त्याने इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तब्बल ३३० कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली होती, असा दावा करणारे पुरवणी आरोपपत्र सीबीआयने दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विजय मल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे असूनही त्याने कर्ज फेडलं नाही, असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी जवळपास ९००० कोटींचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने अनेक सरकारी बँकांना तोटा झाला होता. मल्ल्या यांनी बँकांची कर्जे बुडवून लंडनला पलायन केले होते. २०१५-१६ मध्ये किंगफिशर एअरलाइन्सला त्या वेळी रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे बँकांना त्यांचे कर्जही वसूल करता आले नव्हते. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आलीय.

- Advertisement -

सीबीआयने नुकतेच मुंबई न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात तपास संस्थेने मोठा दावा केला आहे. विजय मल्ल्याकडे २००८ ते २०१६-१७ दरम्यान भरपूर पैसा होता. हा तो काळ होता जेव्हा किंगफिशर एअरलाइन्स मंदीतून जात होती. विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये सुमारे ८० कोटी रुपयांची आणि फ्रान्समध्ये सुमारे २५० कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

विजय मल्ल्या यांच्यावर आयडीबीआयसह विविध बँकांकडून ९००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारतात तपास सुरू होण्यापूर्वीच मल्ल्या भारतातून पळून गेला होता. मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आश्रय घेत आहेत. ५ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने मल्ल्याला फरार घोषित केले. त्यानंतर केंद्र सरकार आणि तपास यंत्रणा मल्ल्याला भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी सीबीआयने यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण ११ आरोपींच्या नावांचा समावेश होता, मात्र आता या प्रकरणात आणखी एका नावाची भर पडली आहे. तपास यंत्रणेने पुरवणी आरोपपत्रात IDBI बँकेचे माजी महाव्यवस्थापक बुद्धदेव दासगुप्ता यांचे नाव जोडले आहे.

- Advertisment -