घरताज्या घडामोडीHijab Row: हिजाब घातला नाही तर होतो बलात्कार; कर्नाटकच्या काँग्रेस नेत्याचे खळबळजनक...

Hijab Row: हिजाब घातला नाही तर होतो बलात्कार; कर्नाटकच्या काँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान

Subscribe

कर्नाटकातील हिजाब वादाची (Karnataka Hijab Row) देशभरात चर्चा सुरू आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच यासंदर्भात अनेक राजकीय नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. कर्नाटकचे काँग्रेसचे नेते जमीर अहमद (Zameer Ahmed) यांनी एक खळबळजनक विधान केले असून ते यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. ते म्हणाले की, ‘ज्या महिला हिजाब घालत नाहीत, त्यांचा बलात्कार होतो. इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा असा होतो.’

- Advertisement -

 

नक्की काय म्हणाले काँग्रेसचे नेते जमीर अहमद?

काँग्रेस नेते जमीर अहमद यांनी यामागचा असा तर्क सांगितला की, ‘भारतात बलात्कार होण्याचा दर सर्वाधिक आहे. हिजाब मुलींची सुंदरता लपवण्यासाठी असतो.’ दरम्यान केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले होते की, ‘इस्लाममध्ये हिजाब हा बंधनकारक भाग आहे. जसे की पगडी शीख धर्मासाठी आहे. यासंदर्भातील वाद एका कटाचा भाग आहे, जेणेकरून मुस्लिम मुली पुढे जाण्यापासून रोखल्या जाऊ शकतात.’

- Advertisement -

जमीर अहमद हे आरिफ मोहम्मद खान यांच्या विधानावर पलटवार करत असताना म्हणाले की, ‘ते असे कोणत्या विचाराने बोलले हे मला माहित नाही. हिजाबला इस्लाममध्ये पडदा म्हटले जाते. त्यांच्या घरी आई, बहिणी आहेत की हे मला माहित नाही. जर त्यांच्या घरी आई, बहिण असतील तर त्यांना हे माहित असते. मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांची सुंदरता लपवण्यासाठी हिजाब घातला जातो. सर्वाधिक बलात्कार हे भारतात होत आहेत. याचे कारण काय? महिला पडद्यात राहत नाहीत, यामुळे बलात्कार होत आहेत. हिजाब घालणे हे पूर्वीपासून चालत आले आहे. पण हिजाब घालणे बंधनकारक नाही, ज्यांना हिजाब घालायचा नाही तर ठिक आहे.’


हेही वाचा – Karnataka Hijab Row: हिजाब वादादरम्यान कर्नाटकात आजपासून १० वी पर्यंतचे वर्ग झाले सुरू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -