महिला स्टाफच्या भांडणामुळे पुरुष शिक्षकांवर सॅरीडॉन घेण्याची वेळ, शिक्षण मंत्र्याचे अजब वक्तव्य

where theres female staff either principal or male teacher takes saridon jaipur education minister govind singh dotasara
महिला स्टाफच्या भांडणामुळे पुरुष शिक्षकांवर सॅरीडॉन घेण्याची वेळ, शिक्षण मंत्र्याचे अजब वक्तव्य

महिला शिक्षकांबद्दल केलेल्या अजब वक्तव्यामुळे आता राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा चांगलेच चर्चेत आले आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना गोविंदसिंह म्हणाले, महिला भांडखोर असतात. त्यांच्या या गुणांमुळे त्या पुरषांच्या पुढे जाऊ शकत नाही. ज्या शाळांमध्ये अधिक महिला कर्मचारी असतात. तेथे भांडणाचे प्रमाण अधिक असते. शाळेतील महिलांच्या भांडणांसंदर्भात अनेक तक्रारी येतात. जर महिलांनी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा केली तर त्या पुरुषांच्या पुढे जाऊ शकतात असं डोटासरा म्हणाले. मात्र डोटासरा यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे,

गमतीत बोलताना डोटासरा बोलून गेले की, महिलाच्या भांडणामुळे शाळेतील पुरुष स्टाफला अत्यंत त्रास होतो. महिलांच्या भांडणांमुळे अनेक वेळा पुरुष शिक्षण आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन गोळी घाण्याची वेळ येते. डोटासरा पुढे म्हणाले की, सरकाराने महिलांसाठी योजना आणल्या आहेत. सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींतून बाहेर पडत पुरुषांच्याही पुढे जावे. मात्र शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांच्या वक्तव्याचे महिला वर्गाकडून जोरदार विरोध केला जात आहे.

यापूर्वी कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर त्याच्या महिलांविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. यावेळी बोलताना डॉ. सुधाकर म्हणाले की, आधुनिक भारतीय महिलांना मुलांना जन्म देण्याची इच्छा नसते. एकतर त्यांना अविवाहित राहायचे असते किंवा लग्नानंतर त्यांची मुलांना जन्म देण्याची इच्छा नसते. त्यांनी सरोगसीद्वारे मुलं पाहिजे असतात. असं डॉ. सुधाकर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना म्हणाले होते.


..तेव्हा नवाब मलिकांचा राजीनामा का नाही घेतला, लखीमपूर घटनेवरुन दरेकरांचा पवारांना सवाल