दिल्ली : तप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जेरोधा’चे सहसंस्थापक निखील कामथ यांना एक मुलखात दिली आहे. त्यात राजकीय प्रवास आणि भविष्यावर पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे. यावेळी असा कोणता युवा नेता आहे, ज्यात सगळ्या जास्त राजकीय क्षमता आहे? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला होता. त्यावर असे अनेक लोक आहेत, असं उत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.
अनेक लोक पूर्ण क्षमतेने काम रात्र आणि दिवस काम करतात. ही लोक मिशन मोडमध्ये काम करतात, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.
हेही वाचा : माझ्या भाषणापूर्वीच विशाल पाटील निघून गेले; नितेश राणेंनी सांगितलं ‘कारण’
तुम्ही कुठल्या एका व्यक्तीचं नाव घेऊ इच्छितात का? असा प्रश्न निखील कामथ यांनी विचारल्यावर पंतप्रधान म्हणाले, “मी कुणा एका व्यक्तीचं नाव घेतले, तर अनेक जणांवर अन्याय होईल. मी कुणावरही अन्याय करू नये, हेच माझे दायित्त्व आहे. पण, माझ्यासमोर अनेक चेहरे आहेत. अनेकांच्या बारीक-सारिक गोष्टींबद्दल मला माहिती आहे.”
“राजकारणात आल्यावर निवडणूक लढणे गरजेचे नसते. ही एक लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. ज्याला संधी मिळते, तो निवडणूक लढत असतो. जनतेचं मन जिंकणे गरजेचे असते,” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
सार्वजनिक जीवनातील आव्हानांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं, “कार्यालय असो किंवा राजकारण अनेक ठिकाणी आपापल्यात वाद असतात. पण, त्याचा अर्थ असा नाही की व्यक्तीनं गेंड्याच्या कातडीचे असले पाहिजे. सार्वजनिक जीवनात संवेदनशीलता खूप गरजेची आहे. संवेधनशील नसाल, तर इतरांचे कल्याण करू शकणार नाही.”
“गुजरातचा मुख्यमंत्री बनल्यावर मी निश्चित केलेले की, मेहनत करण्यात कुठेही कमी पडणार नाही. मी स्वत:साठी काहीच करणार नाही. मी चुकीचे कोणतेही काम करणार नाही. या गोष्टींना मी जीवनाचा मंत्र केला. मी माणूस आहे, देव नाही. परंतु, मी रंग बदलणारा व्यक्ती नाही. तुम्ही कधी चुकीचे केले नाही, तर तुमच्यासोबत काही चुकीचे होणार नाही,” असं मोदींनी म्हटलं.
हेही वाचा : “चंद्रपूर हा वाघ अन् ‘वारां’चा जिल्हा, आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, त्यामुळे…”, ‘CM’फडणवीसांची फटकेबाजी