नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या राज्याच्या प्रचारात मग्न आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर केली. आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलन कार्यक्रमात 2024 लोकसभा निवडणूक आणि मणिपूर हिंसाचार या मुद्यांवर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊ शकतात. मग पंतप्रधान का जात नाही?, भाजपने मणिपूरच्या महिलांना सुरक्षा दिली का?, महिलांवर अत्याचार आणि हत्या होत आहे. पण भाजप इतर राज्याच्या प्रचार करण्यात मग्न आहेत. 2024 निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करू, असा मला विश्वास आहे.”
मणिपूर हिंसाचारवर पंतप्रधान गप्प
“पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचारावर बोलण्यासाठी विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणावला लागला. केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर मणिपूरमध्ये काही लोकांची घरे जाळली गेली आणि अनेक लोकांना स्थलांतरीत देखील केले. पण पंतप्रधानांनी यासंदर्भात संसदेत काही बोलले नाही,” अशी टीका मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधानांवर केली.
हेही वाचा – मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी तिकडे ढुंकूनही पाहले नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात
कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा पार पडली. यासभेत देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, इशान्यकडेल राज्यात आज हिंसाचार वाढत आहे. यांच्या शेजारी चीन आणि पाकिस्तान आहे. त्यांची नजर आपल्या देशावर आहे. त्यामुळे सतर्क राहावे लागते. जर आपण गाफिल राहलो तर कधी काय होईल सांगता येत नाही. आज मणिपूर पेटला आहे. समाजा-समाजामध्ये भांडण झाली, एक वर्गविरुद्ध दुसरा वर्ग अशी स्थिती आहे. गावे जाळली जात आहेत, स्त्रियांची धिंड काढली जाते. असे असतानाही भाजप सरकार कुठल्याही प्रकारचे पाऊले टाकत नाही. देशाचे पंतप्रधानांनी इतक्या बघिणींची अशी अवस्था झालेली असतानाही मणिपूर जाणे आवश्यक होते मात्र, पंतप्रधानाने ढुंकणसुद्धा पाहले नाही, तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर फक्त 3 मिनिटं बोलले, एकुणच त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.