घरदेश-विदेशसाहेबांच्या व्हिस्कीचे चाहते वाढले; करून दिली रग्गड कमाई

साहेबांच्या व्हिस्कीचे चाहते वाढले; करून दिली रग्गड कमाई

Subscribe

कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्र देशभरातील अनेक राज्यांनी देशीसह विदेशी दारु विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे विदेशी दारुची आयातही वाढली. कोरोना संपल्यानंतरही विदेशी दारूची मागणी काही कमी झाली नाही. सध्या तर अनेकजण विदेशी मद्याला अधिक पसंती देतात. गेल्या वर्षभरा तब्बल व्हिस्कीची आयात सुमारे ६० टक्क्यांनी वाढली आहे. स्कॉटलंडमधील एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्लीः दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंडसोबत भारताचे आर्थिक संबंध अधिक घनिष्ठ आहेत. इंग्लंडहून आयात होणाऱ्या व्हिस्कीची मागणी भारतात वाढत आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या व्हिस्कीला फ्रान्समध्ये सर्वाधिक मागणी होती. भारताने फ्रान्सलाही मागे टाकले आहे.

कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांनी देशी व विदेशी दारु विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे विदेशी दारुची आयातही वाढली. कोरोना संपल्यानंतरही विदेशी दारूची मागणी काही कमी झाली नाही. सध्या तर अनेकजण विदेशी मद्याला अधिक पसंती देतात. गेल्या वर्षभरात व्हिस्कीची आयात सुमारे ६० टक्क्यांनी वाढली आहे. स्कॉटलंडमधील एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

व्हिस्कीची आयात करण्यात फ्रान्स हा पहिल्या क्रमांकाचा देश होता. मात्र भारतातील तळीरामांनी फ्रान्सलाही मागे टाकले. गेल्या वर्षी व्हिस्कीच्या ७०० एमएलच्या २१.९ कोटी बाटल्यांची भारतात आयात झाली. फ्रान्समध्ये २०.५ कोटी व्हिस्की बॉटलची आयात करण्यात आली. येत्या काही दिवसांत भारतात व्हिस्कीची मागणी अजून वाढणार असल्याचे संकेत या अहवालातून देण्यात आले आहेत.

स्कॉच व्हिस्कीला जगभरातून मागणी आहे. भारतासह अनेक देशांमध्ये स्कॉच व्हिस्कीचे चाहते आहेत. स्कॉच कंपनीने जगभरात ६.२ अरब पौंड किंमतीच्या व्हिस्कीची निर्यात केली आहे. गेल्या वर्षभरात स्कॉच व्हिस्कीच्या निर्यातीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा आहे.

- Advertisement -

राजकीय नेत्यांपासून अनेक सेलिब्रेटी व्हिस्कीच्या प्रेमात आहेत. शो मॅन राज कपूर यांना तर इंग्लंडमधील एका विशिष्ट दुकानातलीच व्हिस्की आवडायची. राज कपूर अन् त्यातही कपूर खानदान म्हणजे खवय्याचे खानदान. खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या कुटुंबातच जन्माला आल्यामुळे राज कपूर यांनाही वेगवेगेळे पदार्थ खाण्याबरोबरच वेगवेगळे मद्याचे ब्रँण्ड चाखण्याचा छंदच होता. पण त्यांच विशेष प्रेम होतं ते ‘जॉनी वॉकर ब्रँड’च्या ‘ ब्लॅक व्हिस्की’वर. ती ही थेट लंडनच्या दुकानातून आणलेली. त्यांना त्याच दुकानातली जॉनी वॉकर आवडायची. राज यांचे पुत्र रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की माझ्या वडिलांना मद्य पिणे आवडायचे. पण ते कुठलंही मद्य पित नव्हते. तर त्यांचा स्वतःचा असा ब्रँण्ड होता. जॉनी वॉकर ब्रँण्डची ब्लॅक व्हिस्की त्यांना प्रिय होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -