Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी WHO कडून मोठी घोषणा, कोरोना विषाणूची लाट संपली

WHO कडून मोठी घोषणा, कोरोना विषाणूची लाट संपली

Subscribe

मागील तीन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं होतं. देशातील अनेक राज्यांत कोरोना विषाणूने हातपाय पसरले होते. मात्र, कोरोनाची लाट संपल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी सांगितले की, काल आपत्कालीन समितीची १५वी बैठक झाली. यामध्ये कोविड-१९ ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. तसेच ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरीही कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं.

- Advertisement -

जेव्हा कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. तेव्हा चीनमध्ये १०० पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, तीन वर्षांनंतर हा आकडा ७० लाखांच्या वर पोहोचला आणि सुमारे २० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला, असंही डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.


हेही वाचा : Russian Diplomat Punch Video: Ukraine चा झेंडा खेचला; रशियन नेत्याला युक्रेनच्या खासदाराने केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल


 

- Advertisment -