WHO Alert : नेशन्सची जागतिक संघटना असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) सोमवारी (4 सप्टेंबर) एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत आणि तुर्कीच्या बाजारात लिव्हरवरील बनावट औषध विकले जात असकल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओने सतर्क करताना म्हटले की, लोकांना कथित बनावट औषध डिफिब्रोटाइड सोडियमविरुद्ध (DEFITELIO) चेतावणी दिली आहे. तसेच लिव्हरवीर औषध तपासून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. (WHO Alert Fake Liver Drugs are being sold in India INSTRUCTION TO VERIFY NAMES)
डब्ल्यूएचओने जारी केलेल्या चेतावणीमध्ये म्हटले की, डब्ल्यूएचओ डिफिब्रोटाइड सोडियम (DEFITELIO) या औषधाच्या बॅचच्या संदर्भात इशारा देत आहे. लिव्हरसंबंधित हे बनावट औषध भारतात एप्रिल 2023 रोजी आणि तुर्कीमध्ये जुलै 2023 मध्ये आढळून आले आहे. ते नियमांचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने विकले जात आहेत.
हेही वाचा – सगळे भारतीय लक्षात ठेवतील…, सांगत महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदींचे मानले आभार
डब्ल्यूएचओने म्हटले की, डिफिब्रोटाइड सोडियम (DEFITELIO) हे औषध हेमॅटोपोएटिक स्टेम-सेल ट्रान्सप्लांटेशन (HSCT) थेरपीमध्ये वेनो-ऑक्लुसिव्ह रोग (VOD) लिव्हरच्या गंभीर रोग, ज्याला सायनसॉइडल ऑब्स्ट्रक्टिव्ह सिंड्रोमवर (SOS) उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे औषध प्रौढ, पौगंडावस्थेतील, मुले आणि एक महिन्यापेक्षा जास्त वयाच्या अर्भकांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. वेनो-ऑक्लुसिव्ह रोग ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये लिव्हरमधील नसा ब्लॉक होतात आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतात.
UN आरोग्य संस्थेच्या मते, डिफिब्रोटाइड सोडियम (DEFITELIO) या औषधाच्या मूळ निर्मात्याने पुष्टी केली आहे की, चेतावणी देण्यात आलेल्या औषधाचे उत्पादन खोटे आहे. डब्ल्यूएचओने या औषधाच्या मूळ निर्मात्याची आवृत्ती देखील प्रसिद्ध केली आहे. डब्ल्यूएतओने या औषधाविरुद्ध चेतावणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 7 मे 2020 रोजी WHO ने म्हटले होते की, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, लाटविया, मलेशिया आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये हे बनावट औषध विकले जात आहे.
हेही वाचा – ‘INDIA’ आता होणार ‘BHARAT’? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे संकेत; ट्विटरमध्ये काय म्हटले आहे?
दरम्यान, औषध बनवणाऱ्या कंपनीने म्हटले की, बॅच 20G20A सह अस्सल डिफिब्रोटाइड सोडियम (DEFITELIO) जर्मन/ऑस्ट्रियन पॅकेजिंगमध्ये पॅकेज केले आहे, तर बनावट उत्पादनात यूके/आयर्लंड पॅकेजिंग आहे. कंपनीने असेही म्हटले की, औषधाच्या रॅपरवर नमूद केलेली एक्सपायरी तारीख देखील चुकीची आहे आणि नोंदणीकृत शेल्फ लाइफचे पालनही करण्यात आलेले नाही. याशिवाय, बनावट औषधांचा बॅच क्रमांक 20G20A शी संबंधित नाही. भारत आणि तुर्कस्तानमध्ये या औषधाची विक्री करण्याचा अधिकार नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.