घरताज्या घडामोडीजगभरात ५० दशलक्ष मुलांच्या संरक्षणासाठी २०३० अखेरीपर्यंत लसीकरण, WHO चे जागतिक लसीकरण...

जगभरात ५० दशलक्ष मुलांच्या संरक्षणासाठी २०३० अखेरीपर्यंत लसीकरण, WHO चे जागतिक लसीकरण धोरण जाहीर

Subscribe

साल २०३० पर्यंत जगातील एकूण लहान मुलांपैकी अर्ध्या मुलांना लसीकरण करण्याचे ध्येय

जागतिक आरोग्य संघटनेने आणि भागीदारांनी २६ एप्रिल रोजी जगभरातील साथीच्या आजारवार संबंधित बैठक घेतली. या बैठकीत जगातील साथीचा आजार आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या गोवर आणि इतर साथीच्या आजार प्रतिबंधित लसीकरण वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. साल २०३० पर्यंत जगातील ५० दशलक्ष मुलांना लसीकरण करण्याचे धोरण यावेळी ठरवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसिस यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच लहांना मुलांना साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी जगभरात लसीकरण सेवा सुरु केल्या पाहिजेत असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटना, लसीकरण संघटना गवी (GAVI) आणि यूएन चिल्ड्रन एजन्सी (UN Children’s Agency)ने नवीन जागतिक धोरणामध्ये जगभरातील ५० दशलक्ष लहान मुलांना १० वर्षांत साथीच्या आजारापासून वाचवण्याचे ठरविले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसिस यांनी म्हटले आहे की, जर लहान मुलांना साथीच्या रोगापासून, पिवळा ताप,गोवर, डिप्थेरिया सारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवायचे असेल तर प्रत्येक देशात नियमित लसीकरण सेवा दिल्या गेल्या पाहिजेत.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेची रणनिती

नव्या लसीकरणाच्या धोरणात जगातील ९० टक्के कव्हरेज बालपण आणि पौंगडावस्थेतील सर्वांचे लसीकरण २०३० पर्यंत करण्यात येणार आहे. साल २०३० पर्यंत जगातील एकूण लहान मुलांपैकी अर्ध्या मुलांना लसीकरण करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. लहान मुलांना रोटा व्हायरस,कोविड-१९ लस आणि एचपीव्ही आजारांच्या अंतर्गत लसीचा वापर वाढवण्यात येतील तसेच त्या उपलब्ध करुन दिल्या जातील. जागतिक आरोग्य संघटनेची ५० दशलक्ष मुलांचे जीवन वाचवण्याचे ध्येय आहे तसेच यातील ७५ टक्के देशांची क्षमता कमी आहे. नियमित लसीकरण करण्यासाठी तसेच एकही मूल या लसीकरणामध्ये बाकी राहणार नाही यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.गावीचे प्रमुख सेठ बर्कले यांनी चेतावणी दिली की जगभरातील कोट्यवधी मुले मूलभूत लस गमावण्याची बहुधा शक्यता आहे कारण सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारात लसीकरणातील दोन दशकांतील प्रगती ठळक करण्याचा धोका आहे.

- Advertisement -

सध्या जगात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत चालला आहे. यामुळे सुमारे ६० लसीकरण मोहिमा ५० देशांमध्ये स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे २२८ दशलक्ष मुलांना साथीच्या आजारांचा धोका आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे लसीकरणाच्या मोहिमा स्थगित केल्या आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी लस आणि उपकरणांचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. युनिसेफच्या म्हणण्यानुसार साथीचा रोग आजारांमुळे २०२०मध्ये २.०१ अब्ज लसीकरण करण्यात आले आहे. तर २०१९ मध्ये २.२९ अब्ज लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. युनिसेफच्या प्रमुखांनी असेही सांगितले आहे की, आपण महामारीच्या पुर्वीच लसीकरणामध्ये अनेक मुलांना आजारांविरुद्धच्या लढ्यात मागे पडलो आहे. सर्व देशात जवळजवळ २० दशलक्ष मुलांना गंभीर आजाराच्या लसी देण्यात आल्या नाही आणि आता जगात साथीचा आजार वाढला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -