कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर WHOचे महासंचालक क्वारंटाईन!

WHO Chief in quarantine after contact tests positive for Covid-19
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर WHOचे महासंचालक क्वारंटाईन!

जगभरात अजूनही कोरोना कहर कायम आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटींहून अधिक असून यापैकी १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ कोटींहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस क्वारंटाईन झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक क्वारंटाईन झाले आहेत. याबाबत रविवारी माहिती देताना ते म्हणाले की, ‘कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका व्यक्तिच्या संपर्कात आलो असून शरीरात आतापर्यंत कोणतीही लक्षणे दिसून आली नाही आहेत.’

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहे. मी ठीक आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली नाही आहेत, परंतु प्रोटोकॉल अंतर्गत मी काही दिवस स्वतः सेल्फ क्वारंटाईन राहिले आणि वर्क फ्रॉम होम करेन’

तसेच पुढे महासंचालक म्हणाले की, ‘महामारी दरम्यान आरोग्यविषयक संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून रोगाचा प्रसार दर कमी होईल आणि हेल्थ केअर सिस्टमवर कमीतकमी दबाव असेल. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर कमीतकमी १४ दिवस क्वारंटाईन असणे आवश्यक आहे.’

टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, ‘आपण सर्वांनी आरोग्यविषयक सर्व मार्गदर्शक सूचनेचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो. तसेच आपण व्हायरसला रोखू शकतो आणि हेल्थ केअर सिस्टमची रक्षा करू शकतो.जीव वाचविण्यासाठी आणि असुरक्षित लोकांच्या संरक्षणासाठी मी आणि माझे सहकारी एकजुट साधत आहोत.’


हेही वाचा – हिजबुल मुजाहिद्दीनच्या ‘डॉक्टर’ म्होरक्याचा खात्मा! CRPF-पोलिसांचं मोठं यश!