घरताज्या घडामोडीCoronaVirus: ... यामुळे WHO ने लहान मुलांबाबत केली चिंता व्यक्त!

CoronaVirus: … यामुळे WHO ने लहान मुलांबाबत केली चिंता व्यक्त!

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस एॅधानॉम घेबरेयेसस यांनी कोरोना व्हायरस या महामारीवर मात करण्यासाठी वेळ लागले अस म्हटलं आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लहान मुलांनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. घेबरेयेसस म्हणाले की, कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. या महामारीचा परिणाम आरोग्य सेवांवर होत असल्यामुळे विस्कळीत झाली आहे, असं जागतिक आरोग्य संघटना म्हटलं आहे. खासकरून जागतिक आरोग्य संघटनेला गरीब देशांमधील लहान मुलांची चिंता आहे. कोरोनाचा लहान मुलांना धोका कमी असला तरी इतर आजाराचा धोका जास्त आहे. या आजाराला लसीद्वारे रोखले जाऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले की, कोरोनामुळे देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून वाहतूक देखील बंद आहे. त्यामुळे २१ देश इतर आजारांच्या लसींची कमरतेबद्दल तक्रार करीत आहेत. एका नवीन विश्लेषणातून असं समोर आलं आहे की, कोरोनामुळे सहारा-आफ्रिकेच्या ४१ देशांमध्ये मलेरिया विरोधातील मोहिमेमध्ये अडथळा येण्याचा धोका आहे. जर परिस्थिती अजूनच बिकट झाली तर सर्व सहारा-आफ्रिकेत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दुपटीने वाढून शकते.

- Advertisement -

युरोतील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केले जात आहेत. तरीदेखील सर्व संक्रमित व्यक्तींना शोधून काढणं, त्यांना वेगळं ठेवणं, त्यांची चाचणी करणं आणि उपचार करणं आवश्यक असल्याचे सांगून त्या देशांना आवाहन केलं आहे. जेणेकरून रुग्णांची संख्या कमी करता येईल. परंतु दुसरीकडे आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियातील काही देशांमध्ये अद्यापही कोरोना पादुर्भाव वाढत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाची लस टोचून घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मृत्यू, जाणून घ्या सत्य

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -