घरदेश-विदेशवर्षाच्या अखेरीस उपलब्ध होणार कोरोनाची लस; WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचा दावा!

वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होणार कोरोनाची लस; WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचा दावा!

Subscribe

कोरोना रोखण्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्विन प्रभावी ठरते किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) शीर्ष वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना कोरोनाच्या लसीबाबत आशावादी आहे. या वर्षाच्या अखेरीस कोविड -१९ वर लस उपलब्ध नक्की होऊ शकते. त्यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओला पुढील वर्षाच्या अखेरीस कोरोना व्हायरसच्या लसीकरणाचे साधारण दोन अब्ज डोस तयार होणार अशी अपेक्षा आहे, जी प्राधान्य लोकसंख्या असलेल्यांकरता राखीव असेल. तसेच डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही एक मोठी गोष्ट आहे कारण आपल्याकडे अद्याप कोणतीही कोरोना व्हायरसवर लस किंवा औषधोपचार अस्सल नाहीत.

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन प्रभावी नाही पण…

यापूर्वी ते म्हणाले की, हे सिद्ध झाले आहे की कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचा मृत्यू रोखण्यासाठी मलेरियल ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्विन प्रभावी नाही. डॉ. सौम्या स्वामीनाथन असेही सांगितले की, कोविड -१९ चा संसर्ग होण्यापासून लोकांना रोखण्यात या औषधाची भूमिका असू शकते. त्यामुळे या संदर्भात क्लिनिकल चाचण्या देखील सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

सौम्या यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, कोडीड -१९ साथीच्या आजाराची लागण होण्यापासून रोखण्यास किंवा कमी करण्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्विन प्रभावी ठरते किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या इतर चाचण्यांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, आम्हाला अद्याप हे माहित नाही. म्हणूनच, मोठ्या प्रमाणात चाचण्या पूर्ण करण्याची आणि डेटा मिळवण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, जगभरात कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) ने बंदी घातली. कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध वापरु नये, अशा सूचना डब्लूएचओकडून दिल्या आहे. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.


पुढील १५ दिवसात दररोज कोरोनाचे एक लाख रूग्ण आढळतील, WHO चा इशारा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -