घरताज्या घडामोडीआपण कोरोनाशी लढताना थकलो असू, पण कोरोना अजूनही थकलेला नाही -...

आपण कोरोनाशी लढताना थकलो असू, पण कोरोना अजूनही थकलेला नाही – WHO

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच अनेक देशांमध्ये कोरोनावर नियंत्रित मिळवण्यासाठी लसीची निर्मिती केली जात आहे. काही कोरोनाच्या लसींची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. यादरम्यान सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी कोरोना संदर्भात इशारा दिला आहे. ट्रेड्रोस म्हणाले की, ‘आपण या महामाराशी लढताना थकलो असू, पण व्हायरस मात्र अजूनही थकलेला नाही. ‘

जागतिक आरोग्याच्या मुख्य वार्षिक सभेत ट्रेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, ‘त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना समर्थन केलं आहे. यामुळे महामारीचा नाश करण्यासाठी जागतिक सहकार्य मिळेल, अशी आशा त्यांनी जागातिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

जे विज्ञानाशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी महासंचालक म्हणाले की, ‘व्हायरसच्या धोक्यापासून दूर न पळणे हे महत्त्वाचे आहे. आपण जरी कोरोनाशी लढताना थकलो असू, पण कोरोना अजूनही थकलेला नाही.’ क्वारंटाईनतून बाहेर आल्यानंतर ट्रेड्रोस पहिल्यांदाच त्यांनी मुख्य वार्षिक सभेत सहभाग घेतला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘हा व्हायरस कमकुवत लोकांना आपला शिकारी बनवतो. आपण त्याच्याशी ना संवाद साधू शकतो, ना आपले डोळे बंद शकतो आणि आशा करतो की, हे निघून जाईल. हे राजकीय विधानं किंवा षडयंत्र याकडे लक्ष देत नाही. यासाठी आपली एकात्मता, आशा, विज्ञान, निराकरण आणि एकता आहे.’


हेही वाचा – आमचाही कोरोना लसीकरण यादीत समावेश करा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -