घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटपरिसरात निर्जंतुकीकरणाने कोरोना जात नाही, स्वास्थ्याला धोका - WHO

परिसरात निर्जंतुकीकरणाने कोरोना जात नाही, स्वास्थ्याला धोका – WHO

Subscribe

कोरोनाचे पेशंट सापडलेल्या भागामध्ये फवारणीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केलं जात आहे. मुंबईत देखील वॉर्डनुसार हे निर्जंतुकीकरण केलं जात आहे. मात्र, आता याच निर्जंतुकीकरण अर्थात सॅनिटायझेशनच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. रस्त्यांवर किंवा परिसरामध्ये केल्या जाणाऱ्या निर्जंतुकीकरणामुळे कोरोनाचा विषाणू मरत असल्याच्या दाव्यांमध्ये वास्तव नाही, असं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही, तर अशा प्रकारे केलेलं निर्जंतुकीकरण आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतं, असं देखील WHOने स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि हा व्हायरस नष्ट करण्यासाठी घरांच्या बाहेर रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझेशन केलं जात आहे. पण अशा प्रकारचे कोणतेही निर्देश जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेले नाहीत. कारण, अशा प्रकारच्या निर्जंतुकीकरणाचा काही फायदा होत नाही. अशा फवारणीमुळे व्हायरस मरत नाही, असं डब्ल्यूएचओने म्हटल्याचं या वृत्तात नमूद केलं आहे.

- Advertisement -

आरोग्याला होऊ शकतो धोका

दरम्यान, एकीकडे व्हायरस जरी मरत नसला, तरी अशा फवारणीमुळे आरोग्याला मात्र धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकांच्या अंगावर अशा प्रकारे सॅनिटायझरची फवारणी केली जायला नको. यातल्या क्लोरीन आणि इतर केमिकल्सच्या अंगावर फवारणी केल्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, असा दावा WHO ने केला आहे. मात्र, सॅनिटायझर कापडाला लावून त्याने वस्तू स्वच्छ करण्याला काहीही हरकत नसून तशा पद्धतीने वस्तू सॅनिटाईज केल्या जायला हव्यात, असं देखील WHOने जारी केलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -