Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Covid-19 च्या नव्या म्यूटंटचा ब्रेक लावण्याची WHO ने सांगितली पंचसूत्री

Covid-19 च्या नव्या म्यूटंटचा ब्रेक लावण्याची WHO ने सांगितली पंचसूत्री

Related Story

- Advertisement -

संपुर्ण भारतात ११ राज्यांमध्ये कोरोनाच्या संक्रमणामुळे परिस्थिती गंभीर आहे. अशातच कोरोनाने रूग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीतही भर पडलेली आहे. पण दैनंदिन मृत्यूचे आकडे हे भारतीयांच्या कोरोना विरोधातील लढ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणारे असे आहेत. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठीच दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंह यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. कोरोनाविरोधात काही गोष्टींचे तंतोतंत पालन करूनच कोरोनाच्या नव्या म्युटंटचे वाढते संक्रमण थांबवता येऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे.

काय आहे नेमकी पंचसूत्री ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंह यांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पंचसूत्री स्पष्ट केली आहे. कोरोनाचे नियम पाळणे हीच सगळ्यांची पहिली महत्वाची अशी जबाबदारी आहे. त्यासोबतच टेस्ट, ट्रेस आणि आयसोलेट आणि उपचार यासारखे प्रयत्न अधिक करणे गरजेचे आहे. त्यासोबतच कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची ओळख पटवणे, रूग्णांना क्वारंटाईन करणे आणि योग्य उपचार यासारख्या प्रमुख उपायामुळेच नव्या कोरोनाच्या म्युटंटचा प्रसार रोखता येऊ शकतो, असा उपाय त्यांनी सूचवला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हाच एक महत्वाचा असा पर्याय आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य आणि सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या व्हायरसचे संक्रमण थांबवता येऊ शकते, असा दावा खेत्रपाल यांनी केला आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीला व्हायरसचे स्वरूप आणि व्हायरसचे अस्तित्व याबाबत कोणतीच पुर्ण अशी वैद्यकीय माहिती नाही. त्यामुळेच पुर्ण माहिती न मिळणे हा एक चिंतेचा विषय ठरतो आहे. म्हणूनच सर्वांना एकत्र येऊनच व्हायरसविरोधातील लढाई करणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचे जे म्युटंट समोर येत आहेत, त्यावर जागतिक आरोग्य संघटनेमार्फतही लक्ष ठेवण्यात येत आहे. सार्स COV-2 म्युटंटच्या संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक टीमदेखील तयार केली आहे. तसेच या नव्या व्हायरसच्या स्वरूपाबाबत एक जागतिक अशा पातळीची प्रतिक्रिया गरजेची आहे.

अनेक लोकांमध्ये तीन आठवड्याच्या कालावधीतच रोग प्रतिकारक शक्ती तयार होते. पण सद्यस्थितीवर आपण केवळ रोग प्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींवरच काम करत आहोत. संशोधनातून समोर आले आहे की, लोकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती ही अनेक महिने तयार होत राहते. काही जणांच्या बाबतीत सहा महिन्यांचाही कालावधी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या व्यक्तीवर कोरोनाच्या संक्रमणाचा किती परिणाम झाला आहे, यावरच रोग प्रतिकारक शक्ती ठरते. म्हणूनच याबाबतचा अधिक अभ्यास गरजेचा आहे. दोनवेळा कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या बाबतीतही अजुनही कोणताही अभ्यास पुर्णपणे झालेला नाही.

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीमुळे यापुढच्या काळात कोणताही अंदाज लावणे शास्त्रीयदृष्ट्या शक्य नाही. पण गेल्या वर्षभराच्या अनुभवानुसार कोरोनाच्या विरोधातील लढाईत नियमांचे पालन आणि उपाययोजना पाहता कोरोनाच प्रसार रोखता येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे मोठ्या गर्दीने लोकांची उपस्थिती टाळल्यास आणि सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास कोरोनाचा प्रसार कमी होऊ शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा वेग रोखता येऊ शकतो.


 

- Advertisement -