धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कोरोनाचा धोका अधिक – WHO

जागतिक आरोग्य संघटनेने धार्मिक कार्यक्रमांबद्दल चिंता व्यक्त केली.

WHO Chief in quarantine after contact tests positive for Covid-19
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर WHOचे महासंचालक क्वारंटाईन!

जगभरात कोरोना विषाणूचा कहर काय आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे लाखो लाकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कोरोनाबाधिकांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. यामुळे आणखी कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने पुढे म्हटले की, जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणू फैलाव झाल्यामुळे रोज कोरोना रुग्णांचा नवा रेकॉर्ड होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर बदल होत आहेत.

संघटनेचे आपत्काली प्रमुख मायकाल जे. रायन यांनी सोमवारी माध्यमांना सांगितले की, ‘एकाच वेळी कोरोना विषाणू जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये पसरत आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.’ तपासणीत जास्त भर दिल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे, याला रायन यांनी नाकारले आहे.

भारत आणि अमेरिकेसह काही देशांनी कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होण्याचे कारण जास्त तपासणी करणे सांगितले आहे. यावर रायन म्हणाले की, ‘तपासणीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे यावर आमचा विश्वास नाही. अनेक देशांमध्ये रुग्णालयात रुग्णांना भरती करण्याची संख्या वाढली आहे आणि मृतांची संख्या देखील वाढली आहे. अमेरिका, इतर दक्षिण आशिया, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत परिस्थिती बिकट होत आहे.’

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणाले की, ‘नवीन कोरोना केसेसमध्ये निम्मे केसेस उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातील आहेत. तसेच दक्षिण आणि पश्चिम आशियामध्ये देखील कोरोनाचे जास्त केसेस आहेत. आपण नव्या आणि धोकादायक टप्प्यात आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी आताही प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्याची आवश्यकता आहे.’


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!