Covid-19 Vaccine: दर ६ महिन्यांनी घ्यावा लागणार लसीचा बूस्टर डोस? WHO ने दिलं उत्तर

जागतिक आरोग्य संघटना

देशात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असणार की नाही, याचे योग्य मूल्यांकन एका वर्षात केले जाणार आहे. यासंदर्भात माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, जगभरात कोरोना संदर्भातील संशोधन चालू आहे, त्यास साधारण १ वर्षाचा काळ लागण्याची शक्यता आहे. यानंतरच हे स्पष्ट होईल की कोविड -१९ लसीचा बूस्टर डोस किती महत्त्वाचा आहे.

६ महिन्यांपर्यंत कोरोना लसीचा प्रभाव

आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लसीचा परिणाम ६ महिन्यांपर्यंत राहणार आहे. असे असतानाही शास्त्रज्ञांनी असे म्हटले, ही लस कित्येक वर्षांपर्यंत आपली प्रतिकारशक्ती मजबूत करू शकते. परंतु अद्याप यावर अधिक संशोधन करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, लस व्हायरसपासून १००% संरक्षण देऊ शकत नाही. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, ‘बूस्टर डोसचा अभ्यास चालू आहे. जर बूस्टर डोस आवश्यक असेल तर लोकांना त्याबद्दल माहिती दिली जाईल.

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांच्या वक्तव्यानंतर चर्चा सुरू

अमेरिकेच्या महामारी रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले की, तेव्हा ज्या लोकांना कोरोना विषाणूची लस घेतलेल्यांना बूस्टर शॉटची आवश्यकता पडणार आहे. फाउची यांनी असेही म्हटले, ‘मला असे वाटत नाही की, कोरोना लसची सुरक्षा कायम स्वरूपी राहिल तर असे अशक्य आहे. यासाठी मला वाटते बूस्टर शॉटची आवश्यकता असणार आहे. लस घेतल्यानंतर बूस्टर शॉट कधी द्यायला पाहिजे याचा आम्ही सध्या अभ्यास करत आहोत.


बंगालमध्ये BJP ला मोठा धक्का! मुकुल रॉय यांची त्यांच्या मुलासह TMC मध्ये घरवापसी