कोरोनाबाबत WHO ने जगाला दिली गुड न्यूज, लसीबाबत केली मोठी घोषणा!

भारतातील सीरम इन्ट्सीट्यूटने लस संशोधनासाठी साडेसातशे कोटी गुंतवले आहेत.

corona vaccine
लस

कोरोनाच्या या तणावपुर्ण वातावरणात केवळ देशासाठी नाही तर जगासाठी दिलासादायक बातमी आहे. डब्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी लवकरच कोरोनाची लस विकसीत होत असल्याची माहिती दिली. येत्या एक ते दिड वर्षात ही लस विकसीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या कोरोनाच्या लसीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. जगभरात २०० प्रयोग केले जात आहेत. तर १५ मानवी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर एक्स्ट्रा झनेका ही कंपनी आहे. अनेक देशात त्यांनी संशोधनाचे दोन टप्पे पुर्ण केले आहेत. तर तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. तर मॉडर्ना कंपनीसुध्दा संधोधनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करेल अशी माहिती शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली.

तर भारतातील सीरम इन्ट्सीट्यूटने लस संशोधनासाठी साडेसातशे कोटी गुंतवले आहेत. तर कमी उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी १०० डोस तयार करणार असल्याचे माहिती त्यांनी यावेळी दिली.


हे ही वाचा – ‘कोरोनिल’ औषधावरून बाबा रामदेव यांच्यावर एफआयआर दाखल!