घरअर्थजगतWho is Gita Gopinath: सातवीपर्यंत ४५ टक्क्यांनी पास होणाऱ्या गीता गोपीनाथ कशा...

Who is Gita Gopinath: सातवीपर्यंत ४५ टक्क्यांनी पास होणाऱ्या गीता गोपीनाथ कशा बनल्या IMFमध्ये नंबर २?

Subscribe

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) भारतीय वंशाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ (chief economist Gita Gopinath) आता खास भूमिकेत दिसणार आहेत. त्यांची बढती करून IMFच्या प्रथम उपव्यवस्थापकीय संचालकपदी (First Deputy Managing Director) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आएमएफमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. पहिल्यांदाच या पदावर भारतीय वंशाचा व्यक्तीची नियुक्त झाली आहे. गीता गोपीनाथ पहिल्यांदा आयएमएफ सोडू इच्छित होत्या. जानेवारी २०२२मध्ये हार्वर्ड महाविद्यालयात पुन्हा जाऊन तिथे शिकवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु आता त्या आयएमएफमध्ये कार्यरत राहतील.

गीता गोपीनाथ यांची कहाणी……

सध्या गीता गोपीनाथ अमेरिकेच्या रहिवाशी आहेत. पण त्यांचे भारतासोबत अतुट नाते आहे. त्यांचा जन्म भारतात झाला होता. लहानपणी त्या अभ्यासात जास्त हुशार नव्हत्या. त्यांचे वडील गोपीनाथ यांनी दी वीकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘सातवीपर्यंत गीताला ४५ टक्के मिळत होते. परंतु त्यानंतर तिला ९० टक्के मिळू लागले. मी कधी माझ्या मुलांवर अभ्यासासाठी दबाव टाकला नाही. तसेच त्यांच्यावर कोणतीही बंदी घातली नाही. शाळेनंतर गीताने मैसूरमध्ये महाराजा पीयू कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. सायन्समधून पुढील शिक्षण घेतले. तेव्हा तिला मार्कस खूप चांगले मिळत होते आणि ती इंजिनिअर किंवा मेडिसिनमध्ये जाऊ शकत होती. परंतु तिने अर्थशास्त्रामध्ये बीए करण्याचा निर्णय घेतला.’

- Advertisement -

दिल्ली महाविद्यालयच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये ऑनर्सचे शिक्षण घेतले. १९९२ मधून येथून ऑनर्स केले आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून अर्थशास्रात मास्टरकी केली. मग १९९४मध्ये त्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या. ११९६ ते २००१ पर्यंत प्रिंसटन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्रात पीएचडी केली. पोस्टग्रेज्युएशनदरम्यान त्यांची भेट इकबाल नावाच्या व्यक्तीसोबत झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांना १८ वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव राहिल असे आहे.

२००१ ते २००५ पर्यंत शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये गीता गोपीनाथ यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. मग पुढील ५ वर्षांमध्ये म्हणजेच २०१०मध्ये त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक झाल्या. व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट, चलनविषयक धोरणे, कर्ज आणि वाढणाऱ्या बाजारपेठेच्या समस्यांवर सुमारे ४० शोध-पत्र त्यांनी लिहिले आहेत.

- Advertisement -

गीता गोपीनाथ यांच्या विधानामुळे झाला होता वाद

गेल्या वर्षी एका मुलाखतीमुळे गीता गोपीनाथ खूप चर्चेत आल्या होत्या. त्यांनी या मुलाखतीमध्ये जागतिक आर्थिक विकासात घसरण होण्याला जबाबदार भारत असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या की, जागतिक विकासाच्या अंदाजानुसार ८० टक्के विकासात घसरण होण्याला जबाबदार भारत आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार घेरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. २०१६मध्ये सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयालाही गीता यांनी आर्थिक विकासाच्या दृष्टीने नकारात्मक निर्णय असल्याचे म्हटले होते. परंतु गीता यांनी मोदी सरकारने आणलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यांबाबत कौतुक केले होते.

गीता गोपीनाथ यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे कनेक्शन

दरम्यान बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’च्या १२व्या सीझनमधील एका एपिसोडमध्ये गीता गोपीनाथ यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यादरम्यान बच्चन यांनी गीता गोपीनाथ यांच्या सुंदरतेचे कौतुक केले होते. या एपिसोडचा व्हिडिओ गीता यांनी ट्वीटरवर शेअर केला होता आणि म्हटले होते की, ‘मी हे कधीच विसरू शकणार नाही. मी अमिताभ बच्चन यांची खूप मोठी चाहती आहे. माझ्यासाठी हे खूप खास आहे.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -