Video: तरुणींच्या टीक-टॉक व्हिडिओमुळे इम्रान खान यांचे सरकार गोत्यात!

who is hareem shah pakistan tik tok girl viral video rashid sheikh chat sundal khattak
Video: तरुणींच्या टीक-टॉक व्हिडिओमुळे इम्रान खान यांचे सरकार गोत्यात!

पाकिस्तानच्या राजकारणात सध्या टीक-टॉकमुळे गोंधळ उडाला आहे. यामुळे पाकिस्तानच्या मंत्र्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे हार्टबीट्स वाढले आहेत. या दोन टीक-टॉक स्टार तरुणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे टीक-टॉक व्हिडिओ समोर आल्यामुळे संपूर्ण इम्रान खान यांचे सरकार गोत्यात आलं आहे. या दोन तरुणींच नावं हरीम शाह आणि सुंदल खट्टक असं आहे. या दोघींचा परराष्ट्रीय मंत्रालयातील रेल्वेमंत्री राशिद शेख यांच्यासोबतचा टीक-टॉक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ हरीम ही परराष्ट्रीय मंत्रालय दाखवतं असताना दिसतं आहे तर सुंदर ही रेल्वेमंत्री राशिद शेख यांच्याशी बोलताना दिसतं आहे. या सर्व गोष्टीमुळे पाकिस्तान सरकारला अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

याशिवाय सोशल मीडियावर अजून यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हरीम शाह दिसतं आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कॉन्फरन्स रुम मधला आहे. एका बॉलिवूडच्या गाण्यावरचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये हरीम ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खुर्ची बसलेली दिसत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो दिसत आहे.

जिथे मंत्रिमंडळाची बैठक होते ते हे सभागृह असल्याचा सोशल मीडियावर काही लोकांनी दावा केला आहे. याप्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चौकशी करण्यात आली असून हरीम शाह इथे कशी पोहचली याचा शोध घेत आहेत.

या प्रश्नाचे उत्तर हरीमने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे. ती म्हणाली की, तिच्यासाठी ही मोठी गोष्ट नसून ती या खोलीत एक विजिटर म्हणून गेली होती.

पुढे ती म्हणाली की, ती पाकिस्तानच्या संसदेत गेली आहे त्यावेळी तिला कोणीही रोखलं नव्हतं. पाकिस्तानच्या माहितीनुसार, ती परराष्ट्रीय मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉन्फरन्सरुममध्ये पोहचली आहे.

या व्यतिरिक्त हरीम आणि सुदंलचे टीक-टॉक व्हिडिओ हे पाकिस्तानचे नेता, मंत्री, पत्रकार, सेलिब्रिटीसोबत देखील आहेत. या सर्व गोष्टींमुळे हरीमला धमक्या येत होत्या. यादरम्यान पाकिस्तान वृत्तानुसार, हरीमने कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, असं समोर आलं होत.


हेही वाचा – बापरे! भारतात पहिल्याच दिवशी ६७ हजार मुलं आली जन्माला!