Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी CoronaVirus: चीनसाठी WHO ही जनसंपर्क संस्था, लाज वाटली पाहिजे स्वतःची - ट्रम्प

CoronaVirus: चीनसाठी WHO ही जनसंपर्क संस्था, लाज वाटली पाहिजे स्वतःची – ट्रम्प

Subscribe

पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला आहे.

जगात जीवघेण्या कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिक सापडले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यादरम्यान अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला आहे. जागतिक आरोग्य संघटना ही चीनची जनसंपर्क एजेंसी (PR एजेंसी) असल्यासारखे काम करत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांना केला आहे.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं गेलं की त्यांनी अशाप्रकारे काही पाहिलं आहे का?, कोरोना विषाणूची सुरुवात चीनच्या वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधूनच झाली आहे. तर त्यावेळेस ट्रम्प म्हणाले, मी पाहिलं आहे. ते म्हणाले की, मला वाटतं जागतिक आरोग्य संघटनेला लाज वाटली पाहिजे कारण ते चीनसाठी एका पीआर एजेंसी सारखी आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघटनेवर केवळ चीनवर लक्ष आहे. मात्र त्यांनी हे विसरू नये की अमेरिका त्यांना सर्वाधिक पैसा पुरवते, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर बंदी घालण्याच्या विचारात करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होत.

- Advertisement -

अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार,  आतापर्यंत अमेरिकेत १० लाख ९५ हजार २१० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६३ हजार ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन बनले बाबा, होणाऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म


 

- Advertisment -