घरदेश-विदेशनरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सर्वेक्षणाचे 'हे' निष्कर्ष

नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सर्वेक्षणाचे ‘हे’ निष्कर्ष

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातच नव्हे तर, जगभरातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी निवृत्तीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, उलट वेळोवेळी कामाप्रतीचा उत्साह आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रत्यय दिला आहे. याच पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण? तसेच, मोदींव्यतिरिक्त पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती आहे? अर्थातच, या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अपेक्षितच होते.

इंडिया टुडे (India Today) आणि सी व्होटर्स (CVoters) यांनी ‘मूड ऑफ दी नेशन’ (Mood of the Nation Poll) या नावाने सर्वेक्षण केले. त्यात जवळपास 52.2 टक्के लोकांनी पुढचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली आहे. तर, भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यात जोरदार चुरस आहे. 26 टक्के लोकांनी अमित शाह यांची निवड केली आहे तर, 25 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अनुक्रमे 16 टक्के आणि 6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

- Advertisement -

या सर्वेक्षणानुसार, देशाचे पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, असे 52.2 टक्के लोकांना वाटते. तर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 14 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी अनुकूलता दर्शविली आहे. याव्यतिरिक्त, आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाच टक्के तर, योगी आदित्यनाथ यांना 4 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, 47 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना आतापर्यंतचे सर्वात उत्तम पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे.

केंद्रात रालोआच
देशात आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार स्थापन होणार? या प्रश्नावर लोकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (एनडीए) कौल दिला आहे. सर्वेक्षणानुसार, लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएला 298 जागा मिळतील. त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) 153 जागा तर, इतरांना 92 जागा मिळतील. म्हणजेच, एनडीएला 43 टक्के, यूपीएला 30 टक्के तर इतरांना 27 टक्के मते मिळतील, असा निष्कर्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -