घरताज्या घडामोडीभारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा नक्की आहेत तरी कोण?...

भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा नक्की आहेत तरी कोण? त्यांची जबाबदारी काय? जाणून घ्या

Subscribe

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यात होणाऱ्या निवडणूका सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत.

भारताचे २४वे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारपासून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार हाती घेतला. माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून देशाच्या राष्ट्रपतींनी सुशील चंद्रा यांनी नियुक्ती केली. लोकसभा निवडणूकींच्या आधी १४ फेब्रुवारी १०१९ मध्ये सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ हा केवळ एक वर्ष असणार आहे. म्हणजेच १४ मे २०२२ला चंद्रा यांचा कार्यकाळ संपणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यात होणाऱ्या निवडणूका सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत. ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

सुशील चंद्रा यांच्याविषयी अधिक माहिती

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून वर्णी लागलेले सुशील चंद्रा यांचा जन्म १५ मे १९५७ रोजी झाला आहे. त्यांनी से बी. टेकची डिग्री पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देहरादून येथून एलएलबीचे शिक्षणही पूर्ण केले आहे. सुशील चंद्रा हे भारतीय आयकर सेवेत येण्याआधी भारतीय इंजिनीअर सेवेत होते. गेली ३८ वर्षे सुशील चंद्रा हे आयकर सेवेत आहेत. २०१६ ते २०१९ पर्यंत चंद्रा हे केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे चंद्रा यांनी मुंबई, दिल्ली गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्षेत्रातही काम केले आहे.

- Advertisement -

मंगळवारी सुशील चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयोग म्हणून निवड करण्यात आली. पदभार सांभाळताच २४ तासांच्या आता चंद्रा यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या निवडणूकींत भाजप नेत्यांच्या विरोधात टीका केल्या. त्याचबरोबर बंगालमध्ये उर्वरित टप्प्यात कडेकोड बंदोबस्त आणि सुरक्षा करण्यात आली. तर मतदानाच्या पाचव्या टप्प्यातील वेळ हा ४८ तासांवरुन ७२ तास करण्यात आला आहे.

सुशील चंद्रा यांनी निवडणूकींदरम्यान होणाऱ्या प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाता सर्वात जास्त वापर केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रा यांनी पोस्टल बॅलेट तसेच मतदान ओळखपत्र ऑनलाईन तयार करणे आणि ते डाऊनलोड करणे सहज सोपे झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – UP: सर्व जिल्ह्यांमध्ये दर रविवारी होणार लॉकडाऊन, योगी सरकारचा निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -