चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी Nasaने निवडलेले भारतीय वंशाचे अंतराळवीर Anil Menon कोण आहेत?

who is the new astronaut anil menon of indian origin whom nasa is sending to space and mars
चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी Nasaने निवडलेले भारतीय वंशाचे अंतराळवीर Anil Menon कोण आहेत?

नासाने (Nasa) सोमवारी १० नव्या अंतराळवीरांची निवड केली. ज्यामधील अर्धे लष्करी वैमानिक आहेत. नासा या अंतराळ संस्थेने ह्यूस्टरमधील एका कार्यक्रमात या सहा पुरुष आणि चार महिला अंतराळवीरांची ओळख करून दिली. नासाने चंद्रावर आणि मंगळावरील मोहिमेसाठी या १० नव्या अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय वंशाचे अंतराळवारी अनिल मेनन आहेत. आज आपण भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन कोण आहेत? पाहूयात

मिनेसोटाच्या मिनीपोलिसमध्ये जन्मलेले अनिल मेनन २०१८ मध्ये एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स भाग बनले. अनिल मेनन यांचे आई-वडील युक्रेनी आणि भारतीय वंशाचे होते. डेमो-२ मोहिमेदरम्यान मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेत अनिल मेनन यांनी मदत केली होती. तसेच त्यांनी भविष्यातील मोहिमेदरम्यान मानवाला मदत करणारी वैद्यकीय संस्था तयार केली. पोलिओ लसीकरणाचा अभ्यास करण्यासाठी रोटरी राजदूत म्हणून त्यांनी भारतात एक वर्ष काढले होते. यापूर्वी २०१४मध्ये ते नासाशी जोडले आणि विविध मोहिमांमध्ये फ्लाइट सर्जनची भूमिका बजावत अंतराळवीरांना अंतराळ केंद्रात पोहोचवले.

२०१० साली हैती, २०१५ साली नेपाल भूकंप आणि २०११ मध्ये झालेल्या रेनो एअर शो अपघातादरम्यान डॉक्टर म्हणून त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. अनिल मेनन यांनी हवाई दलात फ्लाईट सर्जन ४५वी स्पेस विंग आणि १७३वी फ्लाईट विंगमध्ये सेवा दिली आहे. तर १००हून अधिक उड्डाणांमध्ये ते सामिल राहिले आहेत. दरम्यान आता ते चंद्र आणि मंगळमोहिमेसाठी अंतराळवीरांचे प्रारंभिक प्रशिक्षण जानेवारी २०२२ पासून सुरू करतील जे दोन वर्षे सुरू राहिल.


हेही वाचा – India-Russia summit : भारत-रशियामध्ये बैठकीत राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला चीनचा मुद्दा