घरCORONA UPDATELockdown Crisis: कोण आहे विनय दुबे? त्याच्या आवाहनानंतर वांद्रे येथे गर्दी जमली?

Lockdown Crisis: कोण आहे विनय दुबे? त्याच्या आवाहनानंतर वांद्रे येथे गर्दी जमली?

Subscribe

मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत हजर करण्यात आले. तिथे त्याला अटक करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर आहे. विनय दुबे हा राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्ता आहे का? त्याने केलेले आवाहन राजकीयदृष्ट्या प्रेरीत आहे का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या चौकशीनंतरच याची उत्तरे मिळू शकतील.

मात्र विनय दुबे याने केलेल्या आवाहनावर आपण एक नजर टाकू. आपल्या फेसबुकवर गेल्या अनेक दिवसांपासून विनय स्थलांतरित मजूरांचा प्रश्न मांडत होता. पंतप्रधान मोदींनी १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर करण्याआधीपासून विनय दुबे स्थलांतरीत मजुरांचा प्रश्नाविषयी बोलत होता. दि. १० एप्रिल रोजी त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून निःशुल्क बस सेवेची परवानगी मागण्याची विनंती करणार असल्याचे दुबे म्हणतो.

- Advertisement -

मुंबई से उत्तर प्रदेश बिहार झारखंड के लिए निशुल्क बस सेवा परमिशन पर आज महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय मे मेरी महत्वपुर्ण बैठक !!अगला विडियो 11 अप्रैल 2020 दोपहर 2 बजे !!??? विनय दुबे ???

Vinay Dubey ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 9, 2020

 

- Advertisement -

तर १२ एप्रिल रोजी विनय दुबेने १८ एप्रिल रोजी उत्तर भारतीय मजूरांना पायी उत्तर भारतात घेऊन जाऊ असे आवाहन केले होते. हे आवाहन व्हिडिओ स्वरुपात १२ एप्रिल रोजी पोस्ट केलेले आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर १८ एप्रिल रोजी उत्तर भारतात जाण्यासाठी आवाहन केले असताना १४ एप्रिललाच वांद्रे स्थानकात गर्दी कशी काय जमा झाली?

 

 

 

विनय दुबे फेसबुक पोस्ट
विनय दुबे फेसबुक पोस्ट

विनय दुबेने व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आवाहन ऐका – 

 

???? #सरकार को #आखरी_चेतावनी !!!????✅ यह #विडियो महाराष्ट्र मे #फंसे हर इंसान तक #पहुचाएँ जो #अपने_गाव_घर_परिवार मे #वापस जाना #चाहता है !!???????????? #विनय_दुबे ????????????

Vinay Dubey ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 11, 2020

 

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष

विनय दुबे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेतो. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनातही विनय दुबेचा सहभाग होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे दिसून येते. तसेच मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी देखील ट्विट करत दुबेचा मनसेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

एका फेसबुक पोस्टमध्ये त्याने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे देखील आभार मानले आहेत. विनयच्या वडीलांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या बचतमधील काही रक्कम गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुपुर्द केली होती.

#मुझे_गर्व_है_मै_आपका_बेटा_हुँ_पिताजी…….??जब मै सुबह से दिनभर जरूरतमंद लोगो को #राशन_बाटने निकलता था तो यह देख…

Vinay Dubey ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 10, 2020

 

विनय दुबेला आज कोर्टात सादर करणार

विनय दुबेला अटक करण्यात आल्यानंर त्याच्यावर विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तसेच संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्यातंर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला न्यायालया सादर केले जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -