घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटWHO वुहान दौऱ्यावर, कोरोना उत्पतीचं कारण काढणार शोधून

WHO वुहान दौऱ्यावर, कोरोना उत्पतीचं कारण काढणार शोधून

Subscribe

WHo च्या अधिकाऱ्यांचे पथक सिंगापूरहून वुहानला रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. चिनच्या वुहान शहरातून कोरोना संपूर्ण जगभरात पसरला. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO कोरोना माहामारीचे कारण शोधून काढण्यासाठी चिनच्या वुहान शहरात पोहचणार आहे. आज डब्ल्युएचओचे अधिकारी वुहान शहराचा दौरा करणार आहेत. २०१९च्या डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये पहिला कोरोना रूग्ण आढळला होता. चीनमध्ये कोरोनाबाधित रूग्णसंख्येत वाढ होत आहे. डब्ल्युएचओचे १० अधिकाऱ्यांचे पथक कोरोना माहामारिचे कारण शोधण्यासाठी वुहान दौऱ्यावर जात आहे. अधिकाऱ्यांचे पथक सिंगापूरहून वुहानला रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

डब्ल्युएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी गेल्या आठवड्यात वुहान दौऱ्याचे प्लॉनिंग केले होते. मात्र त्यांची रूपरेषा देण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागली. चीनने सोमवारी डब्ल्युएचओच्या दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यात अनेक देशांचे वैज्ञानिक कोरोना व्हायरस माणसांपर्यंत कसा पोहचला याचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे डब्ल्युएचओच्या प्रमुखांनी सांगितले. हा दौरा कसा असणार आहे याबाबत अद्याप काही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून हा दौरा होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केला जात होता.

- Advertisement -

कोरोन व्हायरसच्या उत्पत्तीच्या प्रकरणातील सर्व अभ्यासांवर चीनने काठोर नियंत्रणे ठेवली आहेत. त्याचप्रमाणे कोरोना हा दुसऱ्या देशातून चीनमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. सुरूवातीच्या काळात लोकांमधील कोरोनाचा स्रोत कसा होता हे जाणून घेण्यासाठी डब्ल्युएचओ वुहानमध्ये संशोधन करणार आहे, असे डब्ल्युएचओचे प्रमुख ट्रेड्रोस यांनी सांगतले. चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसचा धोका वाढत असल्याचे समोर येत आहे. डब्ल्युएचओच्या वुहान दौऱ्याआधीच चीनची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चीनने डब्ल्युएचओच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करणार, असे सांगितले जात आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: केंद्र सरकारने भारत बायोटेकला ५५ लाख डोस खरेदी करण्याची दिली ऑर्डर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -