नवी दिल्ली : नुकतेच समोर आलेल्या एका अहवालानुसार जगातील फक्त सात देशांमध्ये हवेची गुणवत्ता चांगली आहे. तसेच, जगातील बहुतेक देशांमध्ये हवेची गुणवत्ता खराब असल्याचे समोर आले आहे. स्वित्झर्लंडस्थित एअर क्वालिटी मॉनिटरिंग डेटाबेस आयक्यूएअरने 138 देशांमधील 40 हजार एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्समधील डेटाचे विश्लेषण केले. यावेळी असे आढळून आले की, चाड, काँगो, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत या देशांमधील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे समोर आले. तसेच, देशातील 9 सर्वात प्रदूषित 6 शहरांपैकी ईशान्य भारतातील बायर्निहाट या औद्योगिक शहरामध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब असल्याचे समोर आले आहे. (WHO only these 7 countries air qaulity good as per list)
समोर आलेल्या अहवालानुसार, सात देशांनी WHO च्या वार्षिक सरासरी PM2.5 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. ऑस्ट्रेलिया, बहामास, बार्बाडोस, एस्टोनिया, ग्रेनाडा, आइसलँड आणि न्यूझीलंड या सात देशामध्ये हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे समोर आले. ऑस्ट्रेलियाची हवा WHO मानकांनुसार स्वच्छ आणि राहण्यायोग्य असल्याचे या अहवालानुसार समोर आले आहे. IQ AIR च्या यादीनुसार, बार्बाडोसची हवा देखील स्वच्छ आहे. बार्बाडोस हा उत्तर अमेरिकेतील एक अतिशय लहान देश असून त्याची लोकसंख्या फक्त 2.8 लाख आहे. तसेच, कॅरिबियन देशातील बहामासची लोकसंख्या फक्त 4 लाख आहे. येथील हवा WHO मानकांनुसार योग्य असल्याचे आढळून आले आहे.
समोर आलेल्या अहवालानुसार, दोन मोठ्या आणि अनेक लहान बेटांनी बनलेल्या या देशात फक्त 52 लाख लोकसंख्या आहे. न्यूझीलंड हा एक अतिशय सुंदर देश मानला जातो आणि येथील हवा देखील खूप स्वच्छ आहे. तसेच, त्यानंतर ग्रेनाडा हा आग्नेय कॅरिबियन समुद्रातील ग्रेनेडाइन्सच्या दक्षिण टोकावर स्थित एक देश आहे. त्यामध्ये ग्रेनाडा बेट आणि 6 लहान बेटे असून त्याची लोकसंख्या फक्त 1.17 लाख आहे. एस्टोनियाची हवादेखील स्वच्छ मानली जाते. बाल्टिक प्रदेशातील या देशाची लोकसंख्या फक्त 13 लाख आहे. तर, नॉर्डिक बेटांचा देश असलेला आइसलँड त्याच्या भौगोलिक सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. WHO च्या मानकांनुसार, येथील हवा देखील चांगली आणि श्वास घेण्यासाठी परिपूर्ण आहे.
भारतात ही परिस्थिती
समोर आलेल्या अहवालात, भारतातील हवा ही प्रदूषित असून सर्वात खराब हवा असलेल्या गुणवत्तेच्या यादीतील देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी 2023 मध्ये जाहीर केलेल्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर होता. भारताशिवाय चाड आणि बांगलादेशसारख्या देशांचीही स्थिती वाईट आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे स्वच्छ हवा असलेल्या 7 देशांपैकी एकही देश आशिया खंडातील नाही.