कदाचित कोरोना व्हायरस कधीच जाऊ शकणार नाही – WHO

who new

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटना कोरोनाचा पहिला विषाणू गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये सापडल्यापासून या विषाणूचा खात्मा करण्यासाठीची लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातल्या आरोग्य संघटनांनी त्यासंदर्भात संशोधन देखील सुरू केलं. मात्र, गेल्या ५ महिन्यांमध्ये त्यात यश मिळू शकलेलं नाही. अखेर प्रसारमाध्यमांशी बोलताना WHOने कोरोना कदाचित कधीच आपल्याला सोडून जाणार नाही, अशी गंभीर भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता जगाला कोरोनासोबतच जगण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. WHOचे आणीबाणीविषयक प्रमुख मायकल रयान यांनी हा इशारा दिला आहे. ‘कोरोना आता आपल्या जगातल्या इतर विषाणूंप्रमाणेच एक विषाणू बनून कायमचा आपल्यात राहू शकतो. त्यामुळे कदाचित तो कधीही संपणार नाही, अशी शक्यता आहे. एचआयव्हीचा विषाणू देखील आजपर्यंत संपू शकलेला नाही’, असं रयान म्हणाले.

आजघडीला जगभरात कोविड १९ अर्थात कोरोनाच्या जवळपास १०० लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र, अजूनपर्यंत कोरोनाला संपवू शकणाऱ्या लसीचा शोध लागू शकलेला नाही. जगभरातल्या या विषयातल्या अनेक तज्ज्ञांना अशी भिती वाटतेय, की कोरोनावर कधीच लस तयार होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या अनेक देशांनी कोरोना असूनही लॉकडाऊनचे नियम शिथिल करायला सुरूवात केली आहे. मात्र, यामुळे देखील कोरोनाचं संक्रमण वेगाने होऊ शकेल, अशी दुसरी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नक्की कारायचं काय? अशा पेचात जगभरातली राष्ट्र सापडली आहेत.

#FBLive : WHO म्हणतंय, कदाचित कोरोनाचा विषाणू कधीच संपणार नाही.. खरंच आपण कोरोनासोबत जगू शकू का?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮೇ 13, 2020

आपण वास्तववादी व्हायला हवं…

दरम्यान, यावेळी बोलताना रयान यांनी लोकांना वास्तववादी होण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी एड्स आणि कोरोनाची तुलना करत नाही. पण मला वाटतं की आपण वास्तववादी व्हायला हवं. मला वाटत नाही की हा व्हायरस कधी जाईल, याविषयी कुणी काही सांगू शकेल. जेव्हा तुम्ही दररोज सापडणारी रुग्णसंख्या शक्य तितकी कमी केली आणि या विषाणूचा बहुतांश प्रभाव कमी केला, तरच तुम्ही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवू शकता’, असं रयान म्हणाले.