Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश जगभरात वेगाने पसरत आहे कोरोनाचा 'हा' व्हेरिएंट; WHO ने दिला सावधानतेचा इशारा

जगभरात वेगाने पसरत आहे कोरोनाचा ‘हा’ व्हेरिएंट; WHO ने दिला सावधानतेचा इशारा

Related Story

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अडॅनॉम घेब्रेयेसस यांनी कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टा हे नवे रूप जगभरात वेगाने पसरत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी १०४ देशांपर्यंत पोहोचलेला डेल्टा व्हेरिएंट लवकरच संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे सर्वाधिक गंभीर रूप होण्याची शक्यता व्यक्त केली. टेड्रोस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोविड -१९ च्या रूग्णांची संख्या जगभरात वाढत असताना गेल्या आठवड्यातील हा चौथा आठवडा होता. डब्ल्यूएचओच्या सहा क्षेत्रांपैकी एक क्षेत्र वगळता इतर सर्व प्रकरणांमध्ये रूग्ण संख्या वाढली आहेत. ते असेही म्हणाले की, १० आठवड्यांपर्यंतच्या रूग्णांमध्ये घट झाल्यानंतर चिंता वाढल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डेल्टा’ हा नवा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहे, संसर्गाची संख्या आणि जीव गमावलेल्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. ‘डेल्टा’ व्हेरिएंट आता १०४ देशांमध्ये पसरला आहे आणि तो संपूर्ण जगातील सर्वात गंभीर व्हेरिएंट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना व्हायरस सातत्याने बदलत आहे आणि तो अधिक संसर्गजन्य होताना दिसत असल्याचे टेड्रॉस यांनी सांगितले. तसेच चे असेही म्हणाले की, “आपल्याकडे बिघडत चाललेल्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे जीवन, राहिणीमान आणि जागतिक आर्थिक स्थितीची भीती निर्माण होऊ शकते. ज्या ठिकाणी लसींची कमतरता भासते आणि संक्रमणाचा त्रास होत आहे त्या ठिकाणी हे आणखी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी जगाने एकत्र यावे लागेल असेही प्रामुख्याने सांगितले.

- Advertisement -

२४ तासांत देशात ३१ हजार ४४३ नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तसेच आता देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत जगभरात १८ कोटी ८० लाखांहून अधिक कोरोना संसर्गाची नोंद झाली असून त्यापैकी आतापर्यंत ४० लाख ५५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे अमेरिका जगात सर्वाधिक प्रभावित देश असून तेथे आतापर्यंत येथे ३ कोटी ४७ लाखाहून अधिक लोकं बाधित झाले आहेत. त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे ६ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


- Advertisement -