घरCORONA UPDATEदर ३ दिवसांनी दुप्पट होत आहेत Omicronचे रुग्ण, WHO चा धक्कादायक खुलासा

दर ३ दिवसांनी दुप्पट होत आहेत Omicronचे रुग्ण, WHO चा धक्कादायक खुलासा

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉनविषयी दररोज नवीन खुलासे समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जलद गतीने होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जगातील ८९ देशांमध्ये झाला असून दर ३ दिवसांनी ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अध्ययनात असे म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये नागरिकांमध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती आहे त्या देशात देखील नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. परंतु कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांनाच ओमिक्रॉनची लागण होत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची तीव्रता किती आहे याचा अजूनपर्यंत कोणताही मर्यादित डेटा उपलब्ध नाही. ओमिक्रॉनची तीव्रता किती आहे हे जाणून घेण्यासाठी एक योग्य डेटा असणे गरजेचे आहे. मात्र जगभरात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असून नागरिकांना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी सर्व देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि सामाजिक उपाययोजना वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक देशाने आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशियाचे संचालक पूनम खेतरपाल सिंग यांनी म्हटले आहे की, देशांनी योग्य वेळी ठोस पाऊले उचलली तर ओमिक्रॉनचा प्रसार थांबवू शकतो. सर्वाधिक धोका असलेल्या देशांवर आमचे लक्ष आहे.


हेही वाचा – Omicron : …तर भारतात दररोज १४ लाख कोरोना रूग्ण आढळतील, NITI आयोगाच्या सदस्याचा अलर्ट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -