घरCORONA UPDATEजग कोरोना संकटातून लवकर मुक्त होणार नाही, WHO ने दिला इशारा

जग कोरोना संकटातून लवकर मुक्त होणार नाही, WHO ने दिला इशारा

Subscribe

कोरोना विषाणूच्या प्रकोपाने अख्ख्या जगाला वेठीस धरलेय. त्यामुळे हे संकट केव्हा संपणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोरोनामुळे झालेले मृत्यू, लॉकडाऊनमुळे ओढावलेले आर्थिक संकट आणि इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूसंदर्भात चिंता वाढवणारी माहिती समोर आणली आहे. जग कोरोना संकटातून लवकर मुक्त होऊ शकणार नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरातून कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे कोरोना विषाणूला पुढील काही दिवस महामारीच्या श्रेणीतून वगळता येणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी येणाऱ्या काही दिवसात कोरोना प्रतिबंधक नियमांची काळजी घ्यावी लागणार असेही WHO ने स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाचे नवे व्हेरियंट जगासाठी चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविरोधी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. लसीकरणमुळे कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊन मृत्यांची संख्या कमी होईल असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

यात आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने खळबळ माजवली आहे. चीनच्या फुजियान प्रांतातील झियामेन शहरात डेल्टा व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले. इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढल्याने या शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या या शहरात पर्यटनासाठी असलेल्या हॉटेल, बार, सिनेमागृह, जीम आणि वाचनालयं बंद करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

- Advertisement -

तुम्ही सरकारला देशद्रोही म्हणणार का? IT कंपन्यांच्या समर्थनार्थ सरसावले रघुराम राजन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -