घरताज्या घडामोडीचिंता वाढली! भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर कोरोना लस कमी असरदार - WHO

चिंता वाढली! भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर कोरोना लस कमी असरदार – WHO

Subscribe

जगभरात अजूनही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम आहे. आतापर्यंत ३८ लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण कोरोना लस आल्यानंतर जगाला दिलासा मिळाला आहे. परंतु आता जागातिक आरोग्य संघटनेने चिंता वाढवणारी बाब सांगितली आहे. भारतामध्ये आढळलेला डेल्टा व्हेरियंटवर कोरोना लस कमी असरदार असल्याचे समोर आले आहे. पण एक दिलासादायक बाब अशी आहे की, लस घेतल्यामुळे मृत्यूचा धोका कमी होता आणि गंभीर आजारापासून वाचवते.

WHO नक्की काय म्हणाले?

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटना म्हणाली की, ‘कोरोना लसीचा असर कमी होणे याचे कारण अनेक म्युटेशनमध्ये होणार बदल मानला जात आहे. भारतात आढळलेला डेल्टा व्हेरियंट हे डेल्टा प्लस व्हेरियंटचे महत्त्वाचे कारण आहे. व्हायरस प्रभावी झाल्याने सक्षम स्वरुपांमध्ये एक जैविक लाभ मिळतो आहे, जे आहे म्युटेशन. ज्याद्वारे व्हायरसचे रुप लोकांमध्ये सहजपणे पसरते.’

व्हायरसच्या या नव्या रुपाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता जाहिर केली आहे. संपूर्ण जगभरात आतापर्यंत २९ देशात कोरोना व्हायरसच्या रुपाने सर्वात जास्त धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. आयसीएमआरचे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणाले की, ‘कोरोनाचे बदलते रुप आणि त्याचे जिनोम डिकोट करण्यासाठी सतत देशातील अनेक संस्था दिवसरात्र संशोधन करत आहे. आतापर्यंत भारतामध्ये कोरोना व्हायरसचे बदललेले रुपाची त्यांना कोणतीही प्रकरण आढळली नाही आहेत. भारतात कहर करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटचे अनेक स्वरुप समोर आले आहेत, परंतु दक्षिण-अमेरिकामध्ये व्हायरसचे बदललेले रुप लॅम्ब्डाबाबत जास्त चिंता करणे गरजेचे आहे.’

- Advertisement -

ज्यांनी कोरोना लसीचा अर्धा डोस (एकच डोस) घेतला आहे, अशा लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटचा अधिक प्रसार होतो. यामुळे व्हायरस आणखी प्रभावी होतो. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या माहितीनुसार, ज्या लोकांना फायझरचा दोन्ही डोस मिळाला आहे, त्याच्या या व्हेरियंटपासून बचाव ८८ टक्क्यांपर्यंत होता. परंतु ज्या लोकांना फायझर किंवा एस्ट्राजेनेकाचा लसीचा एक डोस मिळाला आहे, त्यांचा ३३.५ टक्क्यांपर्यंत या व्हेरियंटपासून बचाव होऊ शकतो.’

दरम्यान रशियाने भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर त्यांची कोरोना लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या लसीच्या तुलनेत त्याची लस जास्त प्रभावी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -