घरताज्या घडामोडीCovid-19 उगमस्थान शोधाची शेवटची संधी, WHO च्या SAGO पॅनेलला जगभरातून ७०० वैज्ञानिकांचे...

Covid-19 उगमस्थान शोधाची शेवटची संधी, WHO च्या SAGO पॅनेलला जगभरातून ७०० वैज्ञानिकांचे अर्ज

Subscribe

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोनाची उगमस्थान शोधण्यासाठी वैज्ञानिकांचे नवीन पॅनेल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची उत्पत्ती शोधण्याचे काम या वैज्ञानिकांकडून करण्यात येईल. covid-19 महामारीचे नेमके कारण शोधण्यासाठी हे नवीन पॅनेल काम करणार आहे. चीन आणि डब्ल्यूएचओच्या संयुक्त अशा सहा महिन्याच्या अभ्यासातून चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोनाची उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी हा अभ्यास म्हणजे शेवटची संधी असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

कसे असणार पॅनेल ?

डब्ल्यूएचओने नव्या पॅनेलची घोषणा करताना कोरोना महामारीसाठी कारणीभूत ठरलेल्या आणि कोरोना व्हायरच्या उगमस्थानाचा अभ्यास या संशोधनातून करणे अपेक्षित आहे. या पॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून ७०० वैज्ञानिकांचे अर्ज आले. पण अंतिम २६ जणांनाच या पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे. सध्या पॅनेलमध्ये नेमलेले वैज्ञानिक हे गरजेनुसार आणखी वाढू शकतात असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे जेष्ठ तज्ज्ञ असलेले माईक रायन यांच्या मते, SARS-CoV-2 चे उगमस्थान शोधण्याची ही शेवटची संधी आहे. या व्हायरसने संपुर्ण जग ठप्प केले होते. त्यामुळे या अभ्यासातून आणखी एक संधी व्हायरसची उत्पत्ती शोधण्यासाठी मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

का होतोय अभ्यास ? 

कोरोनाचे उगमस्थान शोधणे हे माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना मोठी मदत होणार आहे. परिणामी आगामी काळातील महामारीचे संकट टाळता येणे शक्य होईल. पण हा विषय मानवतावादी दृष्टीकोनापेक्षा अधिक राजकीय आहे. आतापर्यंत चीनने त्यांच्या देशातील प्रयोगशाळेच्या माध्यमातून या व्हायरसच्या उत्पत्तीबाबतचा प्रत्येक दावा आक्रमक पद्धतीने फेटाळून लावला आहे. तसेच अशी कोणतीही शंका किंवा तर्क लावण्याचीही संधी चीनने दिलेली नाही.

- Advertisement -

याआधीच्या अभ्यासामध्ये चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे एक अभ्यास मांडत वटवाघुळातून हा व्हायरस माणसांमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला होता. पण अनेकांनी चीनच्या प्रयोगशाळेतून या व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे गृहितक मांडले होते.

याआधीच्या अभ्यासातील उणिवा काय ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांना चीनसोबतच्या अभ्यासातून वुहान लॅबमध्ये संपुर्ण असा प्रवेश देण्यात आला नव्हता. अतिउच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या वुहान लॅबमध्ये चीनच्या वैज्ञानिकांनीच डब्ल्यूएचओसाठी नमुने गोळा करण्याचे काम केले होते. जागतिक आरोग्य संखघटनेच्या महासंचालकांनीही चीनच्या प्रयोगशाळेत पुर्णपणे अभ्यास करता आला नाही हे स्पष्ट केले होते. त्यानंतरच वटवाघुळातून मानवाला व्हायरस संसर्गाची थिअरी सांगण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटनेकडून नेमण्यात आलेल्या नव्या पॅनेलला चीनच्या लॅबमध्ये प्रवेश असणार का ? याचा उलगडा अजुनही झालेला नाही. पण सायन्टिफिक एडव्हायजरी ग्रुप फॉर ओरिजिन्स ऑफ नोव्हेल पॅथेजॉन (SAGO) च्या माध्यमातून आगामी काळातील संभाव्य महामारीचा अभ्यास करण्यात येणार आहे.


हेही वाचा – WHO ने बूस्टर शॉट्स न वापरण्याचे केले आवाहन; जाणून घ्या त्यामागचे कारण


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -