घरताज्या घडामोडीWHOची दिलासादायक माहिती; इतर व्हेरियंटपेक्षा Omicron जास्त संसर्गजन्य असल्याचा अद्याप कोणताही पुरावा...

WHOची दिलासादायक माहिती; इतर व्हेरियंटपेक्षा Omicron जास्त संसर्गजन्य असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नाही

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी नवा व्हेरियंट B.1.1.529 आढळला आणि त्यादिवसापासून संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर लगेचच जागतिक आरोग्य संघटनेने बैठक घेऊन या व्हेरियंटचे ‘व्हेरियंट ऑफ कंसर्न’मध्ये नोंद करत, हा व्हेरियंट चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. तसेच या व्हेरियंटला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले. पण यादरम्यान ओमिक्रॉन हा व्हेरियंट इतर व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने पसरणारा असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, ओमिक्रॉन हा व्हेरियंट इतर व्हेरियंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नाही.

जागतिक आरोग्य संघटना म्हणाली की, दक्षिण आफ्रिकेमधील रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोना संक्रमितांची संख्या वाढ आहे. परंतु यामागचे कारण हे ही असू शकते की, मोठ्या संख्येने लोकं संक्रमित होत आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटना अशी देखील म्हणाली की, या व्हेरियंटमुळे लोकं पुन्हा संक्रमित होण्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे तज्ज्ञासोबत मिळून नवा व्हेरियंट नियंत्रण मिळवण्याचे उपाय आणि लसीसंदर्भातील प्रभाव समजण्याचे प्रयत्न करत आहे. पण ओमिक्रोन इतर व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे, अशी कोणतीही माहिती नाही.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेत आढळेलेल्या या व्हेरियंटचे रुग्ण आता इतर देशात सुद्धा आढळत आहेत. सर्वात जास्त ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण नदरलँडमध्ये आढळले आहेत. नदरलँडमध्ये १३ रुग्णांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय जर्मनी, इटली, बेल्जिअम, इस्राईल, हाँगकाँगमध्ये या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रोनचे डेल्टा व्हेरियंटपेक्षा दुप्पट वेगाने म्युटेशन होत आहे, असे म्हटले जात आहे.


हेही वाचा – Omicron Variant येताच लसीवर जोरदार काम सुरू: काही आठवड्यातच येणार ओमिक्रॉनला हरवायला लस


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -